तथ्य पडताळणी : राज्य सरकारकडून 12 हजार टन पाकिस्तानी कांदा आयात

False अर्थव्यवस्था राजकीय

शेतकऱ्यांना पुन्हा रडवणार कांदा, राज्य सरकारकडून 12 हजार टन पाकिस्तानी कांदा आयात अशी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

अक्राईव्ह

तथ्य पडताळणी

शेतकऱ्यांना पुन्हा रडवणार कांदा, राज्य सरकारकडून 12 हजार टन पाकिस्तानी कांदा आयात ही 6 मे 2019 रोजी पोस्ट अपलोड करण्यात आली आहे. ही पोस्ट नीट वाचली असता या वृत्तपत्रातील कात्रणात तीन वर्ष पूर्ण झाली असताना फडणवीस सरकार असे म्हटल्याचे दिसून येते. फडणवीस यांनी कधी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली हे तपासले असता 31 ऑक्टोबर 2014 रोजी त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याचे दिसून येते. यानुसार 6 मे 2019 रोजी फडणवीस सरकारला साडेचार वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे हे वृत्त सध्याचे नसून जुने असल्याचे लक्षात येते.

अक्राईव्ह

त्यानंतर आम्ही या बातमीच्या कात्रणावर लोकपत्र असा उल्लेख असल्याने दैनिक लोकपत्रची डेटलाईन लिहिण्याची पध्दत आणखी या कात्रणाची पध्दत एकच आहे का हे तपासले असता ही पध्दत सेम असल्याचे दिसून आले. त्यानंतर आम्ही या बातमीतील फोटो गुगल रिव्हर्स इमेज सर्चद्वारे शोधला. तेव्हा हा फोटो पीटीआय या वृत्तसंस्थेचा 21 डिसेंबर 2010 रोजीचा असल्याचे लक्षात आले. द हिंदू या वृत्तपत्राने हा फोटो वेळोवेळी वापरल्याचे दिसून येते. अमृतसर येथे अटारी-वाघा बॉर्डरवर भारतात कांदा घेऊन येणारा हा ट्रक आहे.

अक्राईव्ह

कांद्याचा सध्याचा भाव काय आहे आणि त्यामुळे सरकार कांदा आयात करु शकते का याचाही आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी साम टीव्हीचा 4 एप्रिल 2019 चा एक व्हिडिओ दिसून आला. त्यानुसार कांद्याचे भाव हळूहळू वाढत असल्याचे म्हटले आहे.

कांद्याचा भाव वाढू नयेत आणि कांद्याचा भाव फार घसरु नये यासाठी सरकार काय करणार, याचाही आम्ही शोध घेतला. तेव्हा ऩाफेडमार्फत कांदा खरेदी करुन हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचे दिसून येते.

निष्कर्ष

कांद्याचे भाव सध्या हळूहळू वाढत असून ते स्थिर राखण्याचे सरकारचे प्रयत्न दिसत आहेत. कांदा आयात केल्यास त्याचा फटका शेतकऱ्यांना बसू शकतो. त्यामुळे सरकार नाफेडमार्फत कांदा खरेदी करत असल्याचे दिसून येत आहे. सरकारने कांदा आयात करणार असल्याचे सध्या म्हटले नसून हे बातमीचे कात्रण जुने असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:तथ्य पडताळणी : राज्य सरकारकडून 12 हजार टन पाकिस्तानी कांदा आयात

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False