FALSE CLAIM: मनमोहन सिंग खरंच सोनिया गांधी यांच्या पाया पडले का?

False राजकीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

सोशल मीडियावर सध्या एक फोटो व्हायरल होत आहे. त्यामध्ये पगडी परिधान केलेला एक शीख व्यक्ती सोनिया गांधी यांच्या पाया पडत असल्याचे दिसते. मागे राहुल गांधी कमरेवर हात ठेवून त्याच्याकडे पाहत आहेत. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, हा शीख व्यक्ती म्हणजे भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची पडताळणी केली.

फेसबुकअर्काइव्ह

फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, मित्रांनो, हे लोक देशाला का अक्कल पाजळतात? कमीत कमी मनमोहन सिंग यांच्या वयाचे (85 वर्षे) तरी भान ठेवायचे असते. आणि मागे उभा असलेला खलनायक हसत आहे. या फोटोद्वारे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या टीका केली जात आहे. पडताळणी करेपर्यंत ही पोस्ट 1100 पेक्षा जास्त वेळा शेयर करण्यात आली आहे.

तथ्य पडताळणी

या फोटोमध्ये पाया पडणाऱ्या शीख व्यक्तीचा चेहरा दिसत नाही. तसेच हा फोटो कधी आणि कुठे काढला हे दिलेले नाही. परंतु, फोटोवर गेटी इमेजेस असा वॉटरमार्क दिसतो. गेटी इमेजेस ही एक अमेरिकन स्टॉक फोटो एजन्सी आहे. जगभरातील मीडियाला ही कंपनी फोटो पुरवते.

म्हणून आम्ही गेटी इमेजेसवर विविध कीवर्ड टाकून हा फोटो शोधल. तेव्हा आम्हाला खालील फोटो मिळाला.

Embed from Getty Images

गेटी इमेजसवरील फोटो आणि पोस्टमधील फोटो सारखाच आहे. फोटोच्या कॅप्शननुसार, 29 नोव्हेंबर 2011 रोजी हा फोटो काढलेला आहे. काँग्रेसची युवा संघटना इंडियन युथ काँग्रेसच्या तत्कालिन नवनिर्वाचित सदस्यांची दिल्ली येथे परिषद घेण्यात आली होती. या परिषदेचे नाव ‘बुनियाद’ असे होते. या परिषदेतील इतर फोटो तुम्ही येथे पाहू शकता – गेटी इमेजस

कॅप्शनमध्ये पाया पडणारा व्यक्ती कोणीतरी प्रतिनिधी असल्याचे म्हटले आहे. म्हणजे तो व्यक्ती मनमोनह सिंग नाही.

मग मनमोहन सिंग या कार्यक्रमाला उपस्थित होते का?

मनमोहन सिंग या कार्यक्रमात उपस्थित होते. द हिंदुच्या बातमीनुसार त्यांनी या परिषदेत भाषणदेखील केले. थेट परदेशी गुंतवणुकीला (एफडीआय) मंजुरी देण्याच्या निर्णायाचे त्यांनी यावेळी जोरदार समर्थन केले. त्याविषयी अधिक तुम्ही येथे वाचू शकता – द हिंदूअर्काइव्ह

हिंदुस्थान टाईम्सच्या वेबसाईटवर या परिषदेतील अनेक फोटो दिलेले आहेत. यामध्ये मनमोहन सिंग यांनी निळी पगडी घातलेली दिसते. फेसबुक पोस्टमधील फोटोमध्ये पाया पडणाऱ्या व्यक्तीने भगव्या रंगाची पगडी घातली आहे. यावरून स्पष्ट होते की, पाया पडणारी व्यक्ती मनमोहन सिंग नाहीत.

अधिक फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा – हिंदुस्थान टाईम्स

निष्कर्ष

फेसबुकवरील व्हायरल फोटो 2011 साली झालेल्या इंडियन युथ काँग्रेसच्या परषदेतील असून पाया पडणारी व्यक्ती काँग्रेसचा अनामिक कार्यकर्ता आहे. त्यामुळे मनमोहन सिंग सोनिया गांधी यांच्या पाया पडल्याचा दावा खोटा आहे.

Avatar

Title:FALSE CLAIM: मनमोहन सिंग खरंच सोनिया गांधी यांच्या पाया पडले का?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •