‘चंद्रयान-2’ ने पाठवलेले पृथ्वीचे फोटो म्हणून जुनेच फोटो व्हायरल. पाहा सत्य काय आहे

False आंतरराष्ट्रीय सामाजिक

भारतीय अंतराळ संस्थेच्या अथक प्रयत्नांतून तयार करण्यात आलेल्या संपूर्णतः स्वदेशी बनावटीच्या चंद्रयान-2 ने नुकतीच चंद्राकडे झेप घेतली. अंतराळात पोहचलेल्या या यानाने पृथ्वीचे विलोभनीय फोटो पाठविल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. अवकाशातून घेतलेले हे फोटो नेटीझन्समध्ये कौतुकाचा विषय ठरत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोंची तथ्य पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

विविध फेसबुक पेज आणि युजर्सने चंद्रयान-2 ने पृथ्वीचे पाठवलेले फोटो म्हणून पाच फोटो शेयर केले आहेत. ते तुम्ही खाली पाहू शकता. प्रत्येक फोटोची तथ्य पडताळणी करूयात.

तथ्य पडताळणी

भारतीय अंतराळ संस्थेने अद्याप वरीलपैकी एकही फोटो प्रसिद्ध केलेला नाही. त्यामुळे या फोटोंविषयी करण्यात आलेल्या दावाची पडताळणी करण्यासाठी एक-एक करून गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले.

फोटो क्र. 1

रिव्हर्स इमेज सर्चमधून फेयरवेयर नावाच्या स्पॅनिश टेक्नॉलॉजी वेबसाईटच्या ट्विटर अकाउंटवरून 21 जानेवारी 2017 रोजी केलेल्या ट्विटमध्ये हा फोटो आढळला. यामध्ये स्पष्ट म्हटले की, अंटार्क्टिका खंडाचा हा फोटो नासाने प्रसिद्ध केला होता. म्हणजे हा फोटो चंद्रयान-2 ने काढलेला नाही.

अर्काइव्ह

फोटो क्र. 2

डेव्हिएंट आर्ट नावाच्या वेबसाईटवर नाईट साईड ऑफ अर्थ म्हणून हा वॉलपेपर उपलब्ध आहे. 21 डिसेंबर 2010 रोजी ही आर्ट इमेज अपलोड करण्यात आली होती. म्हणजे गेल्या नऊ वर्षांपासून ही इमेज इंटरनेटवर उपलब्ध आहे.

मूळ फोटो येथे पाहा – डेविएंट आर्ट

फोटो क्र. 3 

हा फोटो नासाने 27 फेब्रुवारी 2017 रोजी प्रकाशित केला होता. ग्वाटेमाला येथील फ्युगो ज्वालामुखीच्या उद्रेकाचा अवकाशातून घेतलेला हा फोटो आहे. त्यामुळे हादेखील चंद्रयान-2चा फोटो नाही.

NASA captures a picture of Guatemala's Fuego volcano erupting from space.

मूळ फोटो येथे पाहा – Imgur

फोटो क्र. 4

हा फोटो एक 3-डी वॉलपेपर इमेज आहे. गेल्या अनेक वर्षापासून हा फोटो इंटरेनटवर उपलब्ध आहे. ब्रिटानिया पीआर नावाच्या ट्विटर अकाउंटवरून 21 जून 2017 साली हा शेयर करण्यात आला होता. त्यापूर्वीदेखील तो उपलब्ध होता.

अर्काइव्ह

फोटो क्र. 5

पृथ्वीवरील सुर्योदयाचे हे काल्पनिक चित्र आहे. ड्रीम्स टाईम नावाच्या वेबसाईटवर ते उपलब्ध आहे. 

मूळ फोटो येथे पाहा – ड्रीम्स टाईम

निष्कर्ष

यावरून हे सिद्ध होते की, हे फोटो चंद्रयान-2 ने पाठवलेले नाही. यातील काही नासाने काढलेले आहेत तर, इतर आर्ट इल्युस्ट्रेशन आणि 3-डी वॉलपेपर इमेजेस आहेत.  त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:‘चंद्रयान-2’ ने पाठवलेले पृथ्वीचे फोटो म्हणून जुनेच फोटो व्हायरल. पाहा सत्य काय आहे

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False