VIDEO: मलेशियातील शिवलिंगाचा व्हिडिओ तमिळनाडूमधील व्हायरल; वाचा सत्य

False सामाजिक

जंगलामध्ये स्थित एका विशाल शिवलिंगाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, हे तमिळनाडूमधील ओशिवलिंगम आहे. तेथे 365 दिवस महादेवाच्या पिंडीवर पाऊस पडतो. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ तमिळनाडुमधील नाही. 

दीड मिनिटांच्या व्हिडिओमध्ये शिवलिंगाचा व्हिडिओ शेअर करून कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “तामिळनाडूमध्ये तारा राजमार्गावर ओशिवलींगम स्थान. ३६५ दिवस पिंडीवर फक्त पाउस पडतो. कोठून पडतो ते कळत नाही. आश्चर्यच आहे.”

https://twitter.com/shivsangini11/status/1521785426524184576

मूळ पोस्ट – ट्विटरफेसबुक

तथ्य पडताळणी

सर्व प्रथम हा व्हिडिओ नेमका कुठला आहे ते शोधले. की-फ्रेमवर गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर या मंदिराचा अनेक व्हिडिओ इंटरनेटवर आढळले. 

युट्यूबवर 2020 मध्ये अपलोड करण्यात आलेल्या व्हिडिओच्या शीर्षकामध्ये या मंदिराचे नाव Shivan Temple म्हटलेले आहे. 

हा धागा पकडून अधिक माहिती घेतल्यावर या मंदिरात चित्रित करण्यात आलेले व्लॉग्स आढळले. मलेशियामधील Selangor मध्ये हे मंदिर आहे. 

या मंदिराचे नाव Shivan Karak Temple – Persatuan Penganut Dewa Athma Arul Jothy Muneeswarar असे आहे. 

या मंदिराचे अधिकृत फेसबुक पेज आपण येथे पाहू शकता.

मलेशियन ह्युमन वेबसाईटनुसार, सिथ्थर नामक एक साधकाने हे मंदिर स्थापन केले होते. नुकतेच या मंदिराला विकसित करण्यात आले. पूर्वी असणारे लहान शिवलिंग बदलून तेथे मोठ्या आकाराचे शिवलिंग स्थापित करण्यात आले आहे. जंगलामध्ये स्थित हे मंदिर वाहत्या पाण्याशेजारी आहे.

गुगल मॅपवर या शिवलिंगाचे विविध फोटो पाहू शकता. 

या मंदिराच्या एका व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, शिवलिंगावर पाऊस पडत नाहीए. 

मूळ व्हिडिओ – युट्यूबयुट्यूबयुट्यूब

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, शिवलिंगाचा हा व्हिडिओ तमिळनाडुतील नाही. हा व्हिडिओ मलेशियातील शिवलिंगाचा आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:VIDEO: मलेशियातील शिवलिंगाचा व्हिडिओ तमिळनाडूमधील व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False