तथ्य पडताळणी : ममतांचा साथीदार अरबुल इस्लामच्या घरात 100 बॉम्ब सापडले?

False राजकीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

बाप रे, कोलकाता येथे ममता बॅनर्जी यांचा साथीदार अरबुल इस्लाम याच्या घरात 100 हून अधिक बॉम्ब सापडले आहेत. सीरिया बनविण्याची तयारी, असे म्हणत ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा, असे सांगणारी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच शेअर होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

अक्राईव्ह

तथ्य पडताळणी

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा निकटवर्तीय अथवा त्यांच्या पक्षात असणाऱ्या कोणत्या अरबुल इस्लाम नावाच्या व्यक्तीकडे 100 हून अधिक बॉम्ब सापडले आहेत का? हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला एनडीटीव्हीचे खालील वृत्त आम्हाला दिसून आले. हे वृत्त गतवर्षी 13 मे 2018 रोजी प्रसिध्द झाले आहे.

अक्राईव्ह

हे वृत्त त्याच काळात अनेक संकेतस्थळांनी दिल्याचेही दिसून येते. माय नेता या संकेतस्थळावर अरबुल इस्लाम याच्यावर अनेक गुन्हे असल्याचेही दिसून येते.

अक्राईव्ह

अरबुल इस्लाम हा आज तृणमूल काँग्रेसशी संबंधित म्हणून ओळखला जातो. याबाबतचे वृत्त फर्स्ट पोस्टने दिले आहे.

एएनएम न्यूज या संकेतस्थळावर 19 मे रोजी अरबुल इस्लामने मतदान केल्याचा फोटोही दिसून येतो.

अक्राईव्ह

द वायरने अरबुल इस्लाम याच्याबद्दल दिलेल्या वृत्तात तो सध्या जामिनावर बाहेर असल्याचे म्हटले आहे.

अक्राईव्ह

निष्कर्ष

माजी आमदार अरबुल इस्लाम यांच्या घराजवळून बॉम्ब जप्त करण्यात आल्याची जुनी घटना सध्या सोशल मीडियावरुन व्हायरल करण्यात आहे. ते सध्या जामिनावर बाहेर आहेत. ही पोस्ट जुनी असून ती नव्याने व्हायरल करण्यात येत असल्याने फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:तथ्य पडताळणी : ममतांचा साथीदार अरबुल इस्लामच्या घरात 100 बॉम्ब सापडले?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •