
अद्भत दृश्य…. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग NH66 कशेडी घाट महाराष्ट्र अशी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आर.डी. अमरुते यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
फेसबुक / Archive
तथ्य पडताळणी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील हा फोटो आहे का? याची तथ्य पडताळणी करण्यासाठी आम्ही रिव्हर्स इमेज सर्चद्वारे या फोटोचा शोध घेतला तेव्हा आमच्यासमोर खालील परिणाम आला.
हा फोटो कशेडी घाटातील नव्हे तर तुर्कीतील असल्याचे या परिणामात दिसून आल्यावर आम्ही आमचा शोध आणखी पुढे नेला. Mersin Antalya Highway, Turkey असे यूटूयबवर टाकल्यावरही आम्हाला या महामार्गाचे अनेक व्हिडिओ दिसून आले. यातील एक व्हिडिओ आम्ही खाली देत आहोत.
गुगल मॅपसवर आम्हाला या ठिकाणीचे दृश्य खालीलप्रमाणे दिसून आले.
त्यानंतर आम्ही गुगल मॅप्सच्या सहाय्याने कशेडी घाट शोधला तो खालील प्रमाणे दिसून आला.
कशेडी घाटाची सध्यस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही वेगवेगळी संकेतस्थळे आणि वृत्तपत्रे पाहिली. त्यावेळी दैनिक लोकसत्ताने (Archive) दिलेले एक वृत्त आम्हाला दिसून आले. या वृत्तानुसार यावर्षी 26 जानेवारी रोजी या घाटातील बोगद्याच्या कामाचा शुभारंभ झाला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या या बोगद्याच्या कामास पूर्ण होण्यास अडीच वर्ष लागणार आहेत. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर्स या बोगद्याचे काम करणार असून या कंपनीच्या संकेतस्थळावरही आम्हाला असे कोणतेही छायाचित्र दिसून आले नाही. दैनिक सामनाने या कामाचे Exclusive छायाचित्रे प्रसिध्द केली आहेत.
निष्कर्ष
कशेडी घाटातील म्हणून सध्या व्हायरल होत असलेला फोटो हा तुर्कीतील असल्याचे फॅक्ट क्रेसेडोंच्या पडताळणीत सिध्द झालेले आहे. कशेडी घाटातील बोगद्याचे काम होण्यास अडीच वर्षे लागणार आहेत. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Title:Fact Check : हा फोटो मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील आहे का?
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
