मुस्लिम युवकांनी कानपुर पोलिसांवर दगडफेक केली नाही; चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल

Social दिशाभूल करणाऱ्या I Misleading

कानपूर शहरातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कानपूर पोलिस गस्त घालत असताना दोन युवक इमारतीवरुन त्यांच्यावर दगडफेक करत आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज करून त्यांना ताब्यात घेतले. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

आमच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला आहे, या व्हिडिओमधील युवक मुस्लिम नव्हते. 

काय आहे दावा ?    

या व्हिडिओ कानपूर शहराचा असून पोलिस शहरात गस्त करत असताना दोन मुस्लिम युवकांनी त्यांच्यावर दगडफेक केली. या घटनेनंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

या व्हिडिओसोबत युजर पोस्टमध्ये लिहितात की, “ हा व्हिडिओ पाहून तुम्हाला खुप आनंद होईल. उत्तर प्रदेशच्या कानपूर शहरात गस्त करणाऱ्या पोलिसांवर दोन मुस्लिम युवकांनी दगडफेक केली. उत्तर प्रदेश पुलिसांनी बिल्डिंगवर चढून त्यांना चोप दिला. तसेच त्यांची बिल्डिंग तोडण्यासाठी बुलडोजरदेखील पाठवले होते.’’  

ट्विटर 

तथ्य पडताळणी

या व्हिडिओ संबंधित कीवर्डस सर्च केले असता एबीपी न्युजच्या फेसबुक पेजवर हा व्हिडिओ सापडला. व्हिडिओसोबत दिलेल्या माहितीनुसार ही घटना उत्तर प्रदेशच्या कानपूर शहरातील देहात येथील आहे. 

दैनिक भास्करच्या बातमीनुसार 18 ऑक्टोबर रोजी किडवाई नगर भागात अवैध बांधकामांविरोधा न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येत होती. यावेळी पोलिससुद्धा उपस्थित होते. 

तेव्हा दोन युवकांनी पोलिसांना शिवीगाळ करीत इमारतीवरून दगडफेक केली. पोलिसांनी लगेच या तरुणांना पकडून चोप देत ताब्यात घेतले. बातमीमध्ये दगडफेक करणाऱ्या युवकांची नावे समीर आणि कार्तिक असे दिलेली आहेत. भोगनीपूर पोलिस ठाण्याअंतर्गत ही घटना घडली होती. 

मूळ बातमी – दैनिक भास्कर

फॅक्ट क्रेसेंडोने भोगनीपूर पोलिस ठाणे प्रमुखांशी संपर्क साधला असता त्यांना सांगितले की, “या घटनेमागे कोणताही सांप्रदायिक किंवा धार्मिक वादाचे कारण नव्हते. दगडफेक करणाऱ्या युवकांना ताब्यात घेतले असून ते दोन्ही हिंदू आहेत. या प्रकरणाचा मुस्लिम समुदायाशी काही संबंध नाही.” 

कानपूर दिहात पुलिसांनी 18 ऑक्टोबर रोजी ट्विटवर या प्रकरणाविषयी सविस्तर महिती दिलेली आहे.   

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, या व्हिडिओमध्ये कानपूर पोलिसांवर दगडफेक करणारे युवर मुस्लिम आहेत हा दावा खोटा असुन चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल केला जात आहे.

Avatar

Title:मुस्लिम युवकांनी कानपुर पोलिसांवर दगडफेक केली नाही; चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल

Fact Check By: Sagar Rawate 

Result: Misleading