Skip to content
Saturday, June 20, 2026
  • Privacy Policy
  • तथ्य तपासण्यासाठी सबमिट करा
Fact Crescendo Marathi | The leading fact-checking website in India

Fact Crescendo Marathi | The leading fact-checking website in India

The fact behind every news!

  • Home
  • Archives
  • About
  • Contact Us
  • Other Languages
    • Hindi
    • English
    • Malayalam
    • Gujarati
    • Tamil
    • Odia
    • Assamese
    • Bangla
    • Manipuri
  • APAC
    • Sri Lanka
    • Myanmar
    • Bangladesh
    • Cambodia
    • Afghanistan
    • Thailand
site mode button

Fact : ICICI बँकेच्या शुन्य शिल्लक खातेदारांना प्रत्येक व्यवहारासाठी द्यावे लागणार अधिक शुल्क

Mixture अर्थव्यवस्था
September 19, 2019January 11, 2022Ajinkya Khadse
        

ICICI बँकेच्या खातेदारांचे अभिनंदन, 16 ऑक्टोबर पासून प्रत्येक व्यवहाराला 125 रुपये चार्ज अशी माहिती रफीक शेख यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. 

फेसबुक / Archive 
तथ्य पडताळणी

आयसीआयसीआय बँकेच्या खातेदारांना खातेदारांना प्रत्येक व्यवहाराला 125 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे का, याची माहिती घेण्यासाठी आम्ही शोध घेतला असता आम्हाला द टाईम्स ऑफ इंडियाने 15 सप्टेंबर 2019 रोजी दिलेले एक वृत्त आम्हाला दिसून आले. या वृत्तात आयसीआयसीआय बँकेच्या शुन्य शिल्लक खातेदारांना रक्कम काढण्यासाठी 100 ते 125 शुल्क द्यावे लागणार असल्याचे म्हटले आहे. हा निर्णय 16 ऑक्टोबरपासून लागू करण्यात येणार असल्याचेही या वृत्तात स्पष्ट करण्यात आले आहे. हा निर्णय मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग निफ्ट, आरटीजीएस आणि युपीआय व्यवहारांना लागु राहणार नाही. ऑनलाईन व्यवहारांना गती देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे आपल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटल्याचे या वृत्तात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. 

द टाईम्स ऑफ इंडिया / Archive

आयसीआयसीआय बँकेने याबाबत नेमके काय म्हटले आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही बँकेच्या संकेतस्थळास भेट दिली. त्यावेळी आम्हाला या संकेतस्थळावर खालील माहिती दिसून आली. यात स्पष्टपणे शुन्य शिल्लक बचत खात्यांना हा निर्णय लागू करण्यात आल्याचे दिसून आले. पहिल्या दोन व्यवहारांसाठी हे शुल्क शंभर रुपये तर त्यानंतरच्या व्यवहारासाठी हे शुल्क 125 असणार असल्याचे यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

आयसीआयसीआय बँकेचे संकेतस्थळ / Archive 

आयसीआयसीआय बँकेचे संकेतस्थळ / Archive

किमान शिल्लक रक्कम न राखणाऱ्या खातेदारांनाही ही निर्णय लागू असणार असल्याचेही बँकेने स्पष्ट केले आहे. 

आयसीआयसीआय बँकेचे संकेतस्थळ / Archive  

निष्कर्ष 

आयसीआयसीआय बँकेने प्रत्येक व्यवहारासाठी 125 रुपये इतके शुल्क लागु केलेले नाही. बँकेने शुन्य शिल्लक असलेल्या खात्यांसाठी आणि किमान शिल्लक न राखणाऱ्या खात्यांसाठी अधिक शुल्क लागु केलेले आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट संमिश्र स्वरुपाची आढळली आहे. 

Avatar

Title:Fact : ICICI बँकेच्या शुन्य शिल्लक खातेदारांना प्रत्येक व्यवहारासाठी द्यावे लागणार अधिक शुल्क

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: Mixture


        
Tagged ICICIICICI BANKMaharashtraMarathi batmyaMarathi newsZero Balance Accountमराठी बातम्यामहाराष्ट्र

Post navigation

Fact : बेलापूर रेल्वे स्थानकाजवळचा व्हिडिओ वेगवेगळ्या ठिकाणांच्या नावाने व्हायरल
सीरियातील या मुलाने मृत्यूपूर्वी “मी देवाला सगळं सांगणार” असे म्हटले नव्हते. वाचा सत्य

Related Posts

FACT CHECK: 72 वर्षांत खरंच रूपया बांगलादेशी “टका”समोर कमजोर पडला का?

September 2, 2019January 11, 2022Agastya Deokar

Fact Check : ATM पिन क्रमांक चोरीला जाऊ नये म्हणून कॅन्सल बटन 2 वेळा दाबायचं का?

June 3, 2019January 11, 2022Ajinkya Khadse

हे पाच पदार्थ भारतीय खातात आवडीने पण विदेशात आहे बंदी; सत्य की असत्य

February 21, 2019January 11, 2022Ajinkya Khadse

Follow us

  • Fact Checks
  • Comments

हाजी अली दर्गाबाहेर हिंदू तरुणाची चाकूने भोसकून हत्या झाली का? जाणून घ्या सत्य

June 17, 2026June 17, 2026Sagar Rawate

अभिजीत दीपके यांना MTV रोडीज शोमधून शिवीगाळ करत बाहेर काढण्यात आले होते?

June 17, 2026June 17, 2026Sagar Rawate

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांना धमकी दिल्याचा जुना व्हिडिओ नव्याने व्हायरल; वाचा सत्य 

June 15, 2026June 15, 2026Sagar Rawate

Fact Check: पंतप्रधान मोदींनी देशाचे सोने विकल्याची कबुली दिली का? जाणून घ्या सत्य

June 12, 2026June 12, 2026Sagar Rawate

राहुल गांधींचा ‘कलारीपयट्टू’ करतानाचा व्हिडिओ नमाज म्हणून चुकीच्या दाव्याने व्हायरल

May 29, 2026May 29, 2026Sagar Rawate
  • 622betlogin  commented on बुर्ज खलिफावर मिसाईल हल्ला झालेला नाही; एआय व्हिडिओ खोट्या दाव्यासह व्हायरल: Hey guys, been messing around on 622betlogin. Pret
  • md.inno3.fr  commented on धुरंधर चित्रपटाचा इफेक्ट म्हणून असंबंधित व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य: steroid cycle results References: md.inno3.fr
  • tihay88  commented on मुस्लिम व्यक्तीने तिरंग्याला विरोध केल्याचा स्क्रिप्टेड व्हिडिओ सांप्रदायिक दाव्यासह व्हायरल: tihay88 is great for quick fun! Jumped in for a fe
  • winter maze  commented on मुस्लिम व्यक्तीने तिरंग्याला विरोध केल्याचा स्क्रिप्टेड व्हिडिओ सांप्रदायिक दाव्यासह व्हायरल: If you're looking for a fun puzzle challenge, wint
  • try to count the boxes brain training  commented on मुस्लिम व्यक्तीने तिरंग्याला विरोध केल्याचा स्क्रिप्टेड व्हिडिओ सांप्रदायिक दाव्यासह व्हायरल: If you're looking for a fun way to boost your brai

Categories

  • False
  • राजकीय | Political
  • सामाजिक
  • आंतरराष्ट्रीय | International
  • Social

Latest Fact Checks Marathi

  • हाजी अली दर्गाबाहेर हिंदू तरुणाची चाकूने भोसकून हत्या झाली का? जाणून घ्या सत्य

    June 17, 2026June 17, 2026Sagar Rawate
  • अभिजीत दीपके यांना MTV रोडीज शोमधून शिवीगाळ करत बाहेर काढण्यात आले होते?

    June 17, 2026June 17, 2026Sagar Rawate

Archives

Fact Crescendo Marathi | Theme: News Portal by Mystery Themes.
  • अस्वीकरण (डिस्क्लेमर)
  • सुधारणा (करेक्शन) पेज
  • सिद्धांतांची संहिता (कोड ऑफ प्रिन्सिपल्स)