निळ्या रंगाच्या समुद्री लाटांचे हे फोटो नेमके कुठले? मालदिव की कोकण? वाचा सत्य

False राष्ट्रीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

निसर्गामध्ये आपल्याला आश्चर्यचकित करण्याची विस्मयकारी क्षमता असते. जादुई वाटावे असे दृश्य निसर्ग आपल्याला दाखवित असतो. निसर्गाच्या अशाच एका चमात्कारिक घटनेचे फोटो आणि व्हिडिओ कुतूहलाचा विषय ठरत आहे.

निळ्या रंगाच्या चकाकणाऱ्या लाटांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो कोकणातील असल्याचा दावा केला जात आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आणि व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती हे फोटो आणि व्हिडिओ कोकणातील नसल्याचे समोर आले.

काय आहे दावा?

रात्री अंधारात निळ्या रंगाने उजळून निघालेल्या समुद्राच्या लाटांचा व्हिडिओ शेयर करून म्हटले की, कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर यावर्षी हि चमकणाऱ्या लाटा.

सोबत एका मोठ्या पोस्टमध्ये 2017 साली एका छायाचित्रकाराने कसे या लाटांची सर्वप्रथम बातमी केली होती त्याचा तपशील दिला आहे.

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

याचा मजकूरासह काही या चमत्कारिक लाटांचे फोटोसुद्धा शेयर होत आहेत. 

मूळ फोटो – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कोकणातील निळ्या लाटा म्हणून सोशल मीडियावर एक व्हिडिओ आणि तीन फोटो शेयर केले जात आहेत. ते नेमके कुठले आहेत. हे शोधून काढल्यावर कळाले की, एकही व्हिडिओ आणि फोटो कोकणातील नाही.

व्हिडिओ क्र. 1

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओचे नीट निरीक्षण केल्यावर त्यात Peter Kragh असा वॉटरमार्क दिसतो. त्यानुसार इंटरनेटवर शोध घेतला असता कळाले की, हा व्हिडिओ अमेरिकेतील सॅन डिएगो शहराच्या समुद्रकिनावरील आहे. 

पीटर क्रॅग हा प्रसिद्ध व्हिडिओग्राफर असून, नैसर्गिक चित्रण करण्यात त्याचा हतखंडा आहे. सदरील व्हिडिओ त्याने स्वतःच्या युट्यूब चॅनेलवर 2014 साली अपलोड केला होता. यावरून स्पष्ट होते की, हा व्हिडिओ ना या वर्षीचा आहे, ना तो कोकणातील आहे.


फोटो क्र. 1 

सत्य – हा फोटो मालदिव येथील Vaadhoo बेटाचा आहे. रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, Doug Perrine नावाच्या छायाचित्रकाराने हा फोटो टिपला होता.

या फोटोग्राफरच्या अधिकृत वेबसाईटवर हा फोटो उपलब्ध आहे. त्यासोबत दिलेल्या माहितीनुसार, हा फोटो मालदिवचा आहे; कोकणातील नाही.

मूळ फोटो – Doug Perrine Photography


फोटो क्र. 2

स्थळ – Vaadhoo बेट, मालदिव

स्रोत – KUONI Travel Company


फोटो क्र. 3 

स्थळ – Vaadhoo बेट, मालदिव

स्रोत – Mainly Maldives


लाटा का चमकतात?

समुद्रात Phytoplankton/Plankton नावाचा सूक्ष्मजीव असतो. आपल्याकडे जसे काजव्यामध्ये जैवप्रकाश निर्माण करण्याची क्षमता असतो, त्याचप्रमाणे प्रकाशमय होणारे हे जीव असतात. त्यांना प्लवंग असेही म्हणतात. लाटांसोबत वाहून येणारे ही जीव पाण्याला अशी विस्मयकारक झळाळी प्राप्त करून देतात.

अधिक सविस्तर माहिती तुम्ही खाली दिलेल्या व्हिडिओत पाहू शकता.

मग कोकणात अशा लाटा दिसतात का?

जगभरात विविध समुद्रकिनाऱ्यांवर अशा लाटा पाहायला मिळतात. कोकणातही तशी दृश्य कॅमेऱ्यात कैद झालेली आहेत.

प्रतीक जाधव या छायाचित्रकाराने नुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली आणि देवगड समुद्र किनाऱ्यांवर अशा निळ्या लाटांचे फोटो टिपलेले आहेत. एबीपी माझा वाहिनीने त्या फोटोंची बातमीसुद्धा केली आहे. ती तुम्ही येथे वाचा शकता.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, मालदिव आणि सॅन डिएगो येथील निळ्या लाटांचे फोटो आणि व्हिडिओ कोकणतील म्हणून व्हायरल होत आहेत. पण हेदेखील तितकेच खरे आहे की, कोकणातही अशा लाटा पाहायला मिळतात. फक्त व्हायरल होणारे फोटो तेथील नाहीत.

Avatar

Title:निळ्या रंगाच्या समुद्री लाटांचे हे फोटो नेमके कुठले? मालदिव की कोकण? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •