इटलीमध्ये कोरोना विषाणूने सर्वाधिक बळी घेतले आहेत. चीनलाही मागे टाकत इटलीमध्ये कोरोनाच्या बळींची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे. त्यामुळे या देशातील भयावह स्थितीबद्दल संपूर्ण जगात गैरसमज पसरविले जात आहेत. रस्त्यावर रुग्णांचा इलाज सुरू असल्याचे फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, इटलीमध्ये आता कोरोनाचे एवढे रुग्ण झाले की, तेथील दवाखान्यांत त्यांना ठेवायला जागा नाही. त्यामुळे भररस्त्यावर त्याच्यावर इलाज करावा लागत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो व्हॉट्सअपवर पाठवून याविषयीची सत्यता विचारली.

काय आहे पोस्टमध्ये?

हे इटली आहे. रुग्णालयांमध्ये यापुढे जागा नाही. घराच्या बाहेर आपला पाय ठेवण्यापूर्वी दोनदा विचार करा, अशा कॅप्शनसह काही फोटो शेयर केले जात आहेत.

Crotia-1.png

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

हेच फोटो या दाव्यासह व्हॉट्सअपवरदेखील प्रचंड व्हायरल होत आहेत.

Screenshot_20200325-161651 (1).png

तथ्य पडताळणी

गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हे फोटो इटलीमधील नाहीत. क्रोएशिया देशामध्ये नुकताच भूकंप आला होता. हे त्याचे फोटो आहेत.

ट्विटरवर Angjelina Ahmeti नावाच्या एका युजरने 22 मार्च रोजी हे मूळ फोटो शेयर केले होते. ते तुम्ही खाली पाहू शकता. तिने लिहिले की, क्रोएशियाची राजधानी Zagreb येथे भूकंपाचे तडाखे बसले. सकाळी आलेला हा 5.4 रिश्टर स्केल ताकदीचा भूकंप 140 वर्षांतील सर्वात मोठा होता. यामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले यामध्ये दवाखान्यांचाही समावेश होता. कोरोना विषाणूच्या साथीचा धोका असताना पेशंटना असे बाहेर काढण्यात आले.

https://twitter.com/angjelinaahmeti/status/1241704716792406018

अर्काइव्ह

या भूकंपाचे इतर फोटो Puk Media वेबसाईटनेदेखील शेयर केले आहेत.

Croatia-1.png

बीबीसीच्या वृत्तानुसार, क्रोएशियाची राजधानी झाग्रेब येथे 22 मार्च रोजी आलेल्या भूकंपामध्ये इमारती आणि वाहनांचे नुकसान झाले. एका तरुणावर छत कोसळल्याने तो गंभीर जखमी झाला. सदरील व्हायरल होणारे फोटो तुम्ही येथे आणि येथे पाहू शकता. गार्डियन वृत्तापत्राने यासंबंधी व्हिडियोदेखील अपलोड केला आहे. तो तुम्ही खाली पाहू शकता.

https://www.youtube.com/watch?v=pr1HRyWgnwA

सोशल मीडिया क्रोएशियामधील भूकंपाचे हे फोटो इटलीच्या नावे व्हायरल झाल्यानंतर Angjelina Ahmeti नावाच्या युजरने त्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तिने लिहिले की, क्रोएशियातील भूकंपानंतरच्या आपत्कालिन परिस्थितीचे मी काढलेले फोटो काही लोक इटलीमधील कोरोनाची भयावह परिस्थिती म्हणून पसरवित आहे. मी त्यांना आवाहन करते की, ही फेक न्यूज शेयर करणे थांबवा.

https://twitter.com/angjelinaahmeti/status/1242437372324741123

अर्काइव्ह

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, रस्त्यावर असलेल्या रुग्णांचे फोटो इटलीमधील नाहीत. हे फोटो क्रोएशियाची राजधानी झाग्रेब येथील असून तेथे गेल्या रविवारी झालेल्या भूकंपानंतर दवाखान्यांतील रुग्णांना सुरक्षेचा उपाय म्हणून बाहेर काढण्यात आले होते. हे त्याचे फोटो आहेत. 

Avatar

Title:क्रोएशियातील भूकंपानंतरचे फोटो इटलीतील कोरोना रुग्णांचे हाल म्हणून व्हायरल. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar

Result: False