सत्य पडताळणी : पंकजा मुंडे म्हणाल्या का, राज्यघटना बदलायची आहे?

True राजकीय

राज्यघटना बदलायची आहे, नवीन नियम करायचेत, असे वक्तव्य महिला व बालकल्याण मंत्री तथा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केल्याचे वृत्त beed.mmarathi.in या संकेतस्थळाने दिले आहे. या वृत्ताची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

आक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी

पंकजा मुंडे यांनी खरोखरच असं वक्तव्य केले आहे का? यासाठी आम्ही शोध घेतला असता आम्हाला युटूयूबवर याबाबतचे अनेक व्हिडिओ दिसून आले. खालील व्हिडिओत 12 मिनिटे 07 सेकंद 12 मिनिटे 33 सेकंद या कालावधीत तुम्ही त्यांचे वक्तव्य तुम्ही पाहू शकता. यात त्यांनी घटनेत बदल करण्याविषयी वक्तव्य केले आहे.

पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. धनंजय मुंडे यांनीही आपल्या भाषणात याचा उल्लेख करत खालील प्रतिक्रिया दिली आहे.

आक्राईव्ह लिंक

पंकजा मुंडे यांच्या व्हेरिफाईड फेसबुक अकाऊंट जात आम्ही या भाषणाची पडताळणी केली. त्यावेळी आम्हाला खालील व्हिडिओ दिसून आला. या व्हिडिओत 51 मिनिटे 44 सेकंद ते 52 मिनिटे 12 सेकंद या कालावधीत तुम्ही पंकजा मुंडे यांचे वक्तव्य तुम्ही ऐकू शकता. या कालावधीत बदल हा शब्द तुम्ही ऐकू शकता.

याच भाषणातील काही अंश आम्ही खाली दिला आहे.

याच फेसबुक पेजवर खालील कात्रणही आम्हाला दिसून आले. हे कात्रण नेमक्या कोणत्या वर्तमानपत्रातील आहे हे मात्र समजू शकलेले नाही.

निष्कर्ष

पंकजा मुंडे यांनी घटना बदल बद्लचे वक्तव्य केले असून हे वृत्त फॅक्ट क्रेसेंडोच्या तथ्य पडताळणीत सत्य आढळले आहे.

Avatar

Title:सत्य पडताळणी : पंकजा मुंडे म्हणाल्या का, राज्यघटना बदलायची आहे?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: True