22 मिनिटांच्या भाषणात 13 मिनिटे केवळ राज ठाकरेंवरच मुख्यमंत्री बोलले का? सत्य पडताळणी

False राजकारण | Politics

सोशल मीडियावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 22 मिनिटांच्या भाषणात 13 मिनिटे राज ठाकरेंवर भाष्य या विषयावर पोस्ट व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रिसेंडोकडून सत्य पडताळणी होईपर्यंत ही पोस्ट अमित राज ठाकरे या फेसबुक पेजवर 274 वेळा शेअर झाली आहे. एक हजार 100 लाईक्स् आणि 79 कमेंटस् मिळाल्या आहेत. या विषयी फॅक्ट क्रिसेंडो टीमने केलेली सत्य पडताळणी.

अर्काईव्ह  

सत्य पडताळणी

या व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आपल्या 22 मिनिटांच्या भाषणात 13 मिनिटे राज ठाकरेंवर भाष्य केले. याशिवाय फेसबुकवरील राज सरकार-जय मनसे या आणि इतर अनेक फेसबुक पेजवर ही पोस्ट व्हायरल झाली आहे.

पोस्टमध्ये लिहिल्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे 22 मिनिटांचे कोणते भाषण आहे का हे सर्वप्रथम शोधले. तसेच त्या भाषणात पोस्टमध्ये लिहिलेल्या गोष्टींचा काही संबंध आहे का हे शोधले. ही पोस्ट अमित राज ठाकरे यांच्या फेसबुक पेजवर 11 मार्च 2019 ला 11 वाजून 19 मिनिटांनी पोस्ट करण्यात आली आहे. त्यानुसार 11 मार्चच्या जवळपास असणारी मुख्यमंत्र्यांची भाषणे शोधण्याचा प्रयत्न करण्यात केला. तेव्हा गुगलवर देवेंद्र फडणवीस भाषण 11 मार्च असे टाकल्यानंतर खालील रिझल्ट समोर आले.

त्यानंतर सीएम श्री देवेंद्र फडणवीस बीजेपी मुंबई महिला मेळावा विथ या लिंकवर क्लिक केले. या संदर्भातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुंबई महिला मेळावा हे भाषण ऐकले. हे संपुर्ण भाषण 13 मिनिट 34 सेकंदाचे आहे. हे भाषण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऑफिशिअल फेसबुक पेजवरही उपलब्ध आहे.

फेसबुक पेज देवेंद्र फडणवीस

अर्काईव्ह

तसेच या फेसबुक पेजवरच स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भाषणाची युट्युब लिंक देखील शेअर केली आहे.

व्हायरल होणाऱ्या पोस्टमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाचा व्हिडिओ युट्युबवर देवेंद्र फडणवीस यांच्या युट्युब चॅनलवर 10 मार्च 2019 रोजी अपलोड करण्यात आला आहे.

व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये लिहिल्याप्रमाणे मुळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे भाषण 22 मिनिटांचे नसून, 13 मिनिट 34 सेकंदाचे आहे. त्यानंतर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये लिहिल्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात आपल्या भाषणात 13 मिनिटे राज ठाकरे यांच्यावर भाष्य केले. हे तथ्य तपासले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुळ भाषणच 13 मिनिटे 34 सेकंदाचे आहे. त्या भाषणात 10.10 मिनिटांपासून 11.21 मिनिटांपर्यंत राज ठाकरे यांचे नाव न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोपट म्हणून उल्लेख केलेला आहे. बाकी संपुर्ण भाषणात भाजपने केलेली विकास कार्य आणि योजना याबद्दल मुख्यमंत्र्यांनी भाषण केले आहे.

अर्काईव्ह

त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये लिहिलेला मजकूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे 22 मिनिटांचे भाषण हे खोटे आहे. 22 मिनिटांमध्ये 13 मिनिटे राज ठाकरे यांच्यावर भाष्य हे देखील खोटे आहे.

निष्कर्ष : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे 22 मिनिटांच्या भाषणात 13 मिनिटे राज ठाकरेंवर भाष्य ही पोस्ट तथ्यहीन म्हणजेच खोट्या माहितीवर आधारित असत्य असल्याचे फॅक्ट क्रिसेंडोच्या पडताळणीत आढळले आहे.

Avatar

Title:22 मिनिटांच्या भाषणात 13 मिनिटे केवळ राज ठाकरेंवरच मुख्यमंत्री बोलले का? सत्य पडताळणी

Fact Check By: Amruta Kale 

Result: False