RAPID FC: जवाहरलाल नेहरूंनी सुभाषचंद्र बोस यांना ‘युद्ध गुन्हेगार’ म्हटले नव्हते. वाचा सत्य

False राजकीय | Political

सोशल मीडियावरील सध्या पोस्ट पसरविली जात आहे की, नेहरुंनी सुभाषचंद्र बोस यांना युद्ध गुन्हेगार म्हटले होते. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली. पोस्टमध्ये नेहरुंच्या नावे एक पत्र शेयर करून म्हटलेय की, जवाहरलाल नेहरूने PM इंग्लंड ला पत्र लिहून शुभाष चंद्र बोस बाबतीत वार क्रिमीनल म्हणून संबोधले गेले. काँग्रेसचे पितळ उघडे पडले…

फॅक्ट क्रेसेंडोने या पत्राची पडताळणी केली असता हे खोटे (FAKE) असल्याचे सिद्ध झाले होते.

मूळ पोस्ट येथे वाच – फेसबुक | फेसबुक

सत्य काय आहे?

पत्राचे नीट निरीक्षण केल्यावर कळेल की, पत्रात इंग्रजी स्पेलिंगच्या अनेक चुका आहेत. यात पंतप्रधान क्लिमेंट अ‍ॅटली याचे नावच चुकविले आहे. त्यांच्या नावाची योग्य स्पेलिंग Attlee अशी आहे. तसेच ते इंग्लंडचे नाही तर, युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान होते. त्यांच्या पदाबाबत अशी चूक होणे अपेक्षित नाही. या पत्रावर राष्ट्रीय अभिलेखागाराचा (National Archives of India) वॉटरमार्क नाही. त्यामुळे हे पत्रदेखील बनावट आहे. 

तसेच सुभाषचंद्र बोस यांचे अभ्यासक आणि लंडनस्थित पत्रकार आशिष रे यांनी नेहरुंनी नेताजींना युद्ध गुन्हेगार म्हटल्याचे पत्र लिहिलेच नव्हते, असे स्पष्ट सांगितलेले आहे.

नेहरुंच्या नावे याच आशयाचे तीन वेगवेगळे पत्र सोशल मीडियावर फिरत असतात. फॅक्ट क्रेसेंडोने 27 एप्रिल 2019 रोजी केलेल्या पडताळणीमध्ये ते कसे बनावट आहेत हे सिद्ध केलेले आहे. सविस्तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून वाचा – 

READ FACTS: नेताजी सुभाषचंद्र बोस यांना नेहरुंनी युद्ध गुन्हेगार म्हटले होते का?

Avatar

Title:RAPID FC: जवाहरलाल नेहरूंनी सुभाषचंद्र बोस यांना ‘युद्ध गुन्हेगार’ म्हटले नव्हते. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False