VIDEO: लोकल सुरू झाल्यावर मुंबईतील रेल्वे स्टेशनवर अशी गर्दी झाली का? वाचा सत्य

False सामाजिक

सुमारे दहा महिन्यांनंतर मुंबईची ‘लाईफलाईन’ म्हणजेच लोकल सेवा 1 फेब्रुवारीपासून सुरू झाली. यानंतर सोशल मीडियावर रेल्वेस्टेशनवरील प्रचंड गर्दीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. रेल्वे प्रशासनाचा ढिसाळपणा म्हणूनही हा व्हिडिओ फिरवला जात आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ  आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ जुना असून, चुकीच्या माहितीसह शेअर होत आहे.

काय आहे दावा?

फ्लॅटफॉर्म आणि रेल्वेपटरीवर तोबा गर्दी जमा झाल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते. हा व्हिडिओ बोरीवली स्टेशनचाही दावा केला जात आहे.

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्हअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्व प्रथम तपासणी केली की, हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे. काही की-फ्रेम्सवर गुगल रिव्हर्स इमेज केल्यावर कळाले की, हा व्हिडिओ तर 2016 पासून इंटरनेटवर उपलब्ध आहे.

युट्यूबवर 21 मार्च 2016 रोजी अपलोड केलेला हा व्हिडिओ पाहा.

याचाच अर्थ की, हा व्हिडिओ आताचा नाही. 

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्यानंतर पश्मिच रेल्वेच्या मुंबई सेंट्रल युनिटने ट्विटद्वारे या व्हिडिओबाबत खुलासा केला की, आमच्यापर्यंत अशा कोणत्याही घटनेची माहिती आलेली आहे. 1 फेब्रुवारी रोजी लोकल सेवा सुरू झाल्यावर झालेल्या गर्दीचा हा व्हिडिओ नाही.

अर्काइव्ह

मग बोरीवली स्टेशनवर किती गर्दी होती?

तब्बल 10 महिन्यांनंतर लोकल सेवा सुरू झाल्यानंतर मुंबईकर सुखावले. ‘फ्री प्रेस जर्नल’ने 1 फेब्रुवारी रोजी बोरीवली स्टेशनवरील एक व्हिडिओ शेअर केला होता. तो तुम्ही खाली पाहू शकता. 

अर्काइव्ह

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, सुमारे चार वर्षांपूर्वीचा व्हिडिओ आताचा म्हणून शेअर करण्यात येत आहे. रेल्वे स्टेशनवर तुफान गर्दी झाल्याचा हा व्हिडिओ 2016 पासून उपलब्ध आहे. कोरोनाकाळानंतर लोकल सुरू झाल्यानंतरचा हा व्हिडिओ नाही.

Avatar

Title:VIDEO: लोकल सुरू झाल्यावर मुंबईतील रेल्वे स्टेशनवर अशी गर्दी झाली का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False