अहमदाबादमधील पक्ष्यांचा व्हिडिओ चंदीगडमधील म्हणून व्हायरल; वाचा सत्य

Coronavirus False राष्ट्रीय सामाजिक

चंदीगड येथील कालीका रोडवर भोरड्या पक्षांनी आकाशात केलेले नक्षीकाम म्हणून सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. देशभरात लॉकडाऊन असल्याने ही किमया दिसत असल्याचेही काहींनी याबाबत म्हटले आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आणि कधीचा आहे, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

फेसबुकवरील मुळ पोस्ट

तथ्य पडताळणी

हा व्हिडिओ कुठला आणि कधीचा आहे, याचा आम्ही शोध घेतला. त्यावेळी आम्हाला युटूयूबवर हा व्हिडिओ द टाईम्स ऑफ इंडियाने 13 फेब्रुवारी 2020 रोजी अपलोड केला असल्याचे दिसून आले. या व्हिडिओखाली देण्यात आलेल्या माहितीत हे दृश्य अहमदाबाद येथील असल्याचा म्हटले आहे. 

Archived Link

Archive

युटुयूबवरील UK Khud (Archive) या वाहिनीने देखील हा व्हिडिओ अहमदाबाद येथील साबरमती रिव्हर फ्रंट येथील असल्याचे म्हटलेले आहे. द टाईम्स ऑफ इंडियाने 13 फेब्रुवारी 2020 रोजी त्यांच्या संकेतस्थळावर हा व्हिडिओ अपलोड केला असल्याचे दिसून येते.

times of india.png

 द टाईम्स ऑफ इंडिया / Archive

यावरुन हे स्पष्ट होत आहे की, हा व्हिडिओ चंदीगड येथील नसून अहमदाबाद येथील आहे. 

निष्कर्ष

हा व्हिडिओ चंदीगड येथील नसून अहमदाबाद येथील आहे. तो लॉकडाऊनच्या काळातील असल्याचा दावा देखील असत्य आहे.

Avatar

Title:अहमदाबादमधील पक्ष्यांचा व्हिडिओ चंदीगडमधील म्हणून व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False