पाकिस्तानातील गर्दीचा व्हिडियो मुंबईतील म्हणून व्हायरल; वाचा सत्य

Coronavirus False

देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू असून कोरोनाबाधितांची संख्या एक लाखाच्यावर गेली आहे. त्यामुळे सोशल डिस्टंन्सिंगवर अधिक भर देण्यात येत आहे. अशा परिस्थित बाजारपेठीतील गर्दीचा एक व्हिडियो शेयर करून दावा करण्यात येत आहे की, तो व्हिडियो मुंबईतील मोहम्मद अली रोड येथील आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा व्हिडियो भारतातील नसल्याचे स्पष्ट झाले.

काय आहे व्हिडियोमध्ये?

बाजारपेठेत खरेदीसाठी उसळलेल्या तुफान गर्दीमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे या व्हिडियोमध्ये दिसते. सोबत कॅप्शनमध्ये म्हटले की, हे दृश्य मुंबईतील मोहम्मद अली रोडवरील आहे.

crowd.png

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सदरील व्हिडियोतील की-फ्रेम्स निवडून रिव्हर्स इमेज सर्च केले असता हा व्हिडियो मुंबईतील नसल्याचे आढळले. पाकिस्तानमधील अनेक युजर्सने हा व्हिडियो काही दिवसांपूर्वीच शेयर केला होता.

पाकिस्तानातील ओएसिस एनर्जी कंपनीचे संचालक ओसामा कुरेशी यांनी सदरील व्हिडियो ट्विट केला असून, त्यात त्यांनी हा व्हिडियो पाकिस्तानातील फैसलाबाद शहरातील असल्याचे म्हटले आहे.

अर्काइव्ह

पाकिस्तानातील पत्रकार मुहम्मद लिला यांनीदेखील हा व्हिडियो ट्वटि करीत म्हटले की, एकीकडे जग घरात बसून आहे तर पाकिस्तानमध्ये मात्र अशी गर्दी पाहायला मिळत आहे. ईदनिमित्त दुकाना सुरू झाल्या असून ग्राहकांची झुंबड उडाली आहे. सगळीकडे असे दृश्य नाही पण हे जे काही होत आहे ते निंदनीय आहे.

अर्काइव्ह

युट्यूबवरीदेखील हा व्हिडियो पाकिस्तानचा म्हणून उपलब्ध आहे. सदरील व्हिडियो इंडिया टुडेनेदेखील फॅक्ट चेक केलेला आहे.

निष्कर्ष

बाजारपेठीतल गर्दीचा हा व्हिडियो मुंबईतील मोहम्मद अली रोडवरील नाही. हा व्हिडियो पाकिस्तानातील फैसलाबाद शहरातील आहे. 

(फॅक्ट क्रेसेंडो मराठी आता टेलीग्रामवरसुद्धा ! आमच्या चॅनेलला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.)

Avatar

Title:पाकिस्तानातील गर्दीचा व्हिडियो मुंबईतील म्हणून व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False