राहुल गांधी जगातील सर्वाधिक सुशिक्षित नेत्यांच्या यादीत झळकले का? वाचा सत्य

False सामाजिक

‘फोर्ब्स’च्या सर्वेक्षणात राहूल गांधी यांची जगातील सुशिक्षित राजकीय नेता म्हणून सातव्या क्रमांकावर निवड झाल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा असत्य असल्याचे स्पष्ट झाले.

काय आहे दावा?

सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले की, जगातील सुशिक्षित राजकीय नेता

फोर्ब्सच्या सर्वेत आदरणीय देशाचे नेते राहुल गांधी यांची सातव्या नंबरला निवड झाली. देशाचा सन्मान वाढवल्याबद्दल आदरणीय राहुलजींचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.’’ 

Rahul Gandhi.png

Facebook Post | Archive 

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम ‘फोर्ब्स’ने सर्वाधिक सुशिक्षित नेत्यांची अशी कोणती यादी प्रसिद्ध केली आहे का हे तपासले. ‘फोर्ब्स’च्या संकेतस्थळावर अशी कोणतीही यादी दिसून आली नाही. ‘फोर्ब्स’ इंडियाच्या ट्विटर खात्यावरही अशी माहिती आढळली नाही. 

गुगलवर यासंदर्भात शोध घेतला असता U2B (Archive) या संकेतस्थळावर 10 सप्टेंबर 2020 रोजी प्रसिद्ध झालेला एक लेख सापडला. यामध्ये जगातील प्रमुखपदी विराजमान नेत्यांच्या शिक्षणाबद्दल माहिती दिलेली आहे. यामध्ये एकूण सहा जणांचा सामावेश असून, जर्मनीच्या चान्सलर अँगेला मर्केल सध्या सर्वाधिक सुशिक्षित नेत्या आहेत. त्यांनी जर्मन विज्ञान अकादमीतून क्वांटम केमिस्ट्रीमध्ये पीएच.डी. केलेली आहे. 

Wisestep (Archive) या संकेतस्थळावरील यादीमध्ये भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे जगातील सर्वाधिक सुशिक्षित नेत्यांच्या यादीत नववा क्रमांक आहे. 

या दोन्ही याद्यांमध्ये राहुल गांधी यांचे नाव नाही.

राहुल गांधी यांचे शिक्षण

राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणूकीच्या अर्जात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राील माहितीनुसार, त्यांनी कॅम्ब्रिज विद्यापीठातून एमफील केलेले आहे. 

निष्कर्ष  

‘फोर्ब्स’ने सर्वाधिक सुशिक्षित नेत्यांची कोणतीही यादी प्रसिद्ध केलेली नाही. त्यामुळे सर्वाधिक सुशिक्षित नेत्यांच्या यादीत राहुल गांधीचे नाव सातव्या क्रमांकावर असल्याचा दावा असत्य आहे. अन्य संस्थांनी अशा स्वरूपाची माहिती प्रसिद्ध केली असली तरी त्यात राहुल गांधींचा समावेश नाही.

Avatar

Title:राहुल गांधी जगातील सर्वाधिक सुशिक्षित नेत्यांच्या यादीत झळकले का? वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False