
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा १० जानेवारी रोजी अमृतसर येथे पोहचली तेव्हाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये राहुल गांधी कोणती तरी गोष्ट करण्यास मनाई करताना दिसतात. या सोबत दावा केला जात आहे की, राहुल गांधी यांनी सुवर्ण मंदिरात गेल्यावर मानाची पगडी घासण्यास नकार दिला. असेही म्हटले जात आहे की, राहुल गांधी कॅमेरा समोर नसल्यावर पगडी घालणार नाही असे म्हणाले.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, राहुल गांधी पगडीबद्दल बोलत नव्हते. ते एका महिलेले सेल्फी देण्यास टाळत होते.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये राहुल गांधी आणि एक व्यक्ती पगडी पाहत असताना त्यांना एक महिला काही तरी बोलते तेव्हा राहुल गांधी तिला नकार देतात.
हा व्हिडिओ शेअर करून लोक म्हणत आहेत की, “बंद कॅमेरासमोर गांधी यांनी शीखांचा अपमान केला. त्यांनी पगडी बांधण्यास नकार दिला.”
मूळ पोस्ट — फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
व्हायरल व्हिडिओ संबंधित किव्हडर्स सर्च केले असता स्टेट न्युज पंजाब नामक फेसबुक पेजवर हा व्हिडिओ मिळाला. या व्हिडिओच्या सुरुवातीला एक महिला राहुल गांधीना फोटो काढण्यासाठी आग्रह करताना दिसते. राहुल गांधी त्यांना नकार देत होते. ते महिलेला हिंदीमध्ये सांगतात “अभी नहीं मैडम, अभी नहीं।”
राहुल गांधी यांना पगडी बांधणाऱ्या व्यक्तीने डेली पोस्ट पंजाबी या न्युज चॅनलला मुलाखत देताना स्पष्ट केले की राहुल गांधी यांनी पगडी घालण्यास नकार दिला नव्हता. त्यांनी त्या महिलेला सांगितले होते की, पगडी बांधल्यावर फोटो मिळेल.
राहुल गांधी यांनी ट्विट करत आपण सुवर्ण मंदिराला दिलेल्या भेटीचा व्हिडिओ बघू शकतो. ज्यामध्ये राहुल गांधीने केशरी रंगाची पगडी घातली होती.
निष्कर्ष
यावरुन स्पष्ट होते की, राहुल गांधी यांनी पगडी बांधण्यास नकार दिला नव्हता. ते महिलाला फोटो काढण्यास नकार देत होते. चुकीच्या दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:राहुल गांधी यांनी पगडी बांधण्यास नकार दिला नव्हता; ते सेल्फी देण्यास नाही म्हणाले होते
Fact Check By: Sagar RawateResult: False
