मेरठमधील अंत्ययात्रेतील मुस्लिम खांदेकऱ्यांचा फोटो पुण्यातील म्हणून व्हायरल; वाचा सत्य

Coronavirus False सामाजिक

कोरोनाकाळात माणुसकीचे दर्शन घडवित काही मुस्लिम तरुणांनी पुण्यातील डॉ. रमाकांत जोशी यांच्या पार्थिवाला खांदा दिला, अशा दाव्यासह एक फोटो व्हायरल होत आहे. जोशी यांचा मुलगा अमेरिकेत तर पत्नी वृद्ध. कोरोनाने मृत्यू झाल्याने त्यांचे नातलग खांदेकरी होण्यास तयार नव्हते. तेव्हा तबलिगीचे काम करणारे हे तरुण पुढे सरसावले, असे सोशल मीडियावरील मेसेजमध्ये म्हटलेले आहे.

फॅक्ट क्रेसेंडोने याबाबत तथ्य पडताळमी केली असता हा फोटो मेरठ येथील असल्याचे समोर आले. 

काय आहे दावा?

screenshot-www.facebook.com-2020.08.28-14_25_48.png

फेसबुक पोस्ट ।  संग्रहित

तथ्य पडताळणी

पुण्यातील रमाकांत जोशी नावाच्या डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू झाला का, याचा शोध घेतला. त्यावेळी असे कोणतेही वृत्त आढळून आले नाही. त्यानंतर हे छायाचित्र रिव्हर्स इमेज केले असता अभिनेते एझाज खान यांनी 28 एप्रिल 2020 रोजी हा फोटो ट्विट केल्याचे आढळले. त्यांनी लिहिले होते की, ही मेरठमधील रमेशचंद्र माथुर यांच्या अंत्ययात्रेचा हा फोटो आहे.  

संग्रहित

हा धागा पकडून शोध घेतला असता एशियानेट या संकेतस्थळानेही 1 मे 2020 रोजी याबाबत सविस्तर वृत्त दिल्याचे आढळले. मेरठ शहरातील शाहपीर गेट या मुस्लिमबहूल भागात राहणारे पुजारी रमेशचंद्र माथुर काही काळापासून आजारी होते. त्यांचे निधन झाले त्यावेळी त्यांचा एक मुलगा दिल्लीला गेलेला होता तर एक मुलगा घरी होता. लॉकडाऊनमुळे नातलगांना येणेही शक्य नव्हते. त्यामुळे मुस्लिम समाजातील युवकांनी पुढाकार घेत रमेशचंद्र माथुर यांच्यावर अंत्यसंस्कार केले, असे बतामीत म्हटले आहे. 

screenshot-newsable.asianetnews.com-2020.08.28-16_06_16.png

एशियानेट ।  संग्रहित

inqlab.png

द इन्कलाबने 29 एप्रिल 2020 रोजी वृत्तानुसार मेरठमधील चित्रगुप्त मंदिराची देखभाल करणाऱ्या रमेशचंद्र माथुर यांची आर्थिक स्थिती बिकट होती. त्यामुळे या अंत्यविधीची सर्व व्यवस्था मुस्लिम समाजाने पार पाडली. या वृत्तातदेखील हे छायाचित्र आपण पाहू शकता.

द इन्कलाब ।  संग्रहित 

निष्कर्ष

या द्वारे स्पष्ट होते की, हे छायाचित्र पुण्यातील डॉ. रमाकांत जोशी नावाच्या व्यक्तीच्या अंत्ययात्रेचे नाही. हा फोटो एप्रिल महिन्यातील मेरठच्या रमेशचंद्र माथुर यांच्या अंत्ययात्रेतील आहे. त्यामुळे पोस्टमधील दावा असत्य ठरतो.

Avatar

Title:मेरठमधील अंत्ययात्रेतील मुस्लिम खांदेकऱ्यांचा फोटो पुण्यातील म्हणून व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False