टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीच्या लोगोसह सध्या समाजमाध्यमात एक स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. या स्क्रीनशॉटमध्ये कोरोनाला देवेंद्र फडणवीस यांची लागण असे म्हटले आहे. या स्क्रीनशॉटवर समाजमाध्यमात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून हा स्क्रीनशॉट टीव्ही 9 मराठीच्या वृत्ताचा आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

काय आहे दावा?

TV9 मराठीने कोरोनाला देवेंद्र फडणवीस यांची लागण असे म्हटले आहे.

Devendra.png

Facebook | Archive

तथ्य पडताळणी

टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीचा हा स्क्रीनशॉट आहे का, याचा शोध घेतला. त्यावेळी टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीने याबाबत दिलेले वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार टीव्ही 9 मराठीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासंबंधीची बातमी चुकीच्या पध्दतीने बदल करून त्याचा स्क्रीनशॉट समाजमाध्यमात व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

TV9 MARATHI.png

Archive

टीव्ही 9 मराठीने याबाबत प्रसारित केलेले वृत्त आपण खाली पाहू शकता.

https://www.youtube.com/watch?v=GiUxZXhZp3s

Archive

टीव्ही 9 मराठीने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून याबाबत केलेले ट्विटही आपण खाली पाहू शकता.

https://twitter.com/TV9Marathi/status/1320050198052139008

Archive

निष्कर्ष

कोरोनाला देवेंद्र फडणवीस यांची लागण असा टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीचा म्हणून व्हायरल होत असलेला स्क्रीनशॉट हा बनावट आहे. याप्रकरणी टीव्ही 9 मराठीने सायबर पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

Avatar

Title:टीव्ही 9 मराठीच्या लोगोसह व्हायरल होणारा हा स्क्रीनशॉट खोटा; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse

Result: False