Fact Check : शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी अजमेर दर्ग्याला भेट दिली का?

False राजकीय

शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर नवसपूर्ती झाल्याने अजमेर येथील ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती गरीब नवाज यांच्या दर्ग्यास भेट दिली, असे सांगत एक फोटो सोशल मीडियावर शेयर केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली.

screenshot-www.facebook.com-2019.12.02-15_50_26.png

फेसबुकवरील मुळ पोस्ट 

तथ्य पडताळणी

या फोटोची सत्यता जाणून घेण्यासाठी गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यावेळी मिळालेल्या परिणामांत हॅलो मुंबई न्यूज या संकेतस्थळावरील 16 मार्च 2018 रोजीचे एक वृत्त आढळले. यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीने अजमेर येथील दर्ग्यास ही चादर उरुसानिमित्त अर्पण केली जाणार असल्याचे म्हटले आहे.

screenshot-www.hellomumbainews.com-2019.12.02-16_26_25.png

हॅलो मुंबई न्यूजचे सविस्तर वृत्त / Archive

युवा सेनेचे नेते राहुल कानल यांनीही याबाबत त्यावेळी ट्विट केले होते. ते देखील आपण खाली पाहू शकता. 

Archive

निष्कर्ष

आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर अजमेर दर्ग्यास भेट दिल्याचे हे छायाचित्र नाही. हे छायाचित्र 2018 मधील आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact Check : शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी अजमेर दर्ग्याला भेट दिली का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False