तथ्य पडताळणी : बाबरी मशीद पाडली तेव्हा साध्वी प्रज्ञा सिंह 4 वर्षाच्या होत्या?

False राजकीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

साध्वी प्रज्ञा सिंह या खोटारड्या असून त्यांनी बाबरी मशीद पाडल्याचा केलेला दावा किती खोटा त्यावेळी त्या केवळ चार वर्षाच्या होत्या, असे सांगणाऱ्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या पोस्टची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

अक्राईव्ह लिंक  

तथ्य पडताळणी

साध्वी प्रज्ञा सिंह यांचे वय सध्या काय हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपले सध्याचे वय 49 असल्याचे नमूद केल्याचे दिसून आले.

आपण हे प्रतिज्ञापत्र खाली दिलेल्या लिंकवरही वाचू शकता.

https://suvidha.eci.gov.in/uploads/affidavit/2019/PC/S12/19/S1220190423083116.pdf

त्यानंतर बाबरी मशीद नेमकी कधी पाडण्यात आली, याचा शोध घेण्यात आला. त्यावेळी आम्हाला बीबीसी मराठीने याबाबत दिलेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तात 6 डिसेंबर 1992 ला बाबरी मशीद पाडण्यात आल्याचे म्हटले आहे.

अक्राईव्ह लिंक

साध्वी प्रज्ञा सिंह यांचा जन्म कधी झाला याची माहिती घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यावेळी विकीपीडियावर त्यांची जन्मतारीख 2 फेब्रुवारी 1970 असल्याचे आम्हाला दिसून आले.

अक्राईव्ह लिंक

निवडणूक आयोगात दिलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणे साध्वी प्रज्ञा सिंह यांचे वय बाबरी मशीद पाडली. त्यावेळी 22 वर्ष असल्याचे दिसून येते. मुंबई उच्च न्यायालयात 2016 मध्ये दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपले वय 44 असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार त्याचे वय सध्या 47 वर्ष आहे. तर त्यांनी निवडणूकीच्या प्रतिज्ञापत्रात आपले वय 49 दर्शवले आहे.

डेक्कन हेरॉल्ड/अक्राईव्ह लिंक

निष्कर्ष

बाबरी मशीद पाडण्यात आली त्यावेळी साध्वी प्रज्ञा सिंह यांचे 4 वर्षाहून अधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांचे वय त्यावेळी 4 वर्ष होते हा दावा असत्य ठरत आहे.

Avatar

Title:तथ्य पडताळणी : बाबरी मशीद पाडली तेव्हा साध्वी प्रज्ञा सिंह 4 वर्षाच्या होत्या?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •