इस्रायलमधील पिरॅमिड पुलावरील रेल्वेचा तो व्हिडिओ बनावट; वाचा सत्य

False आंतरराष्ट्रीय

अतिप्रगतशील देश म्हणून इस्रायलचे नेहमीच नाव घेतले जाते. इस्रायली तंत्रज्ञानाचे तर नेहमीच नाव घेतले जाते. यातच भर म्हणून आता इस्रायलमधील इंजिनिअरिंगचे अचंबित करणारे उदाहरण म्हणून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

मनोऱ्यासम भासणाऱ्या रेल्वेपटरी वरून जाणाऱ्या रेल्वेच्या व्हिडिओसोबत दावा केला जात आहे की, अशा प्रकारच्या ‘पिरॅमिड’ पुलामुळे दोन शहरातील अंतर कमी झाले.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की हा व्हिडिओ खऱ्याखुऱ्या रेल्वेचा नाही. हे केवळ व्हिडिओ सिम्युलेशन आहे.

काय आहे दावा?

व्हायरल व्हिडिओसोबत कॅप्शन दिली आहे की, “अभियांत्रिकीचे सुंदर उदाहरण हा रेल्वे ट्रॅक इस्रायल देशात आहे, जो उरपारा ते बेगुन जर्रा या 1280 किमी अंतरावर आहे, ज्या मार्गावर ही रेल्वे अशा 13 पिरॅमिड पुलांवरून जाते.”

मूळ पोस्ट – फेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

प्रथम पाहणीमध्ये तर हा व्हिडिओ खऱ्या रेल्वेचा वाटत नाही. तसेच व्हिडिओमध्ये Daffa Railfans ID असे लिहिलेले आहे. हे लक्षात घेऊन गुगलवर या नावाने की-वर्ड सर्च केले.

त्यातून युट्यूबवर याच नावाचे एक चॅनेल आढळले. या चॅनेलवरून 21 सप्टेंबर 2021 रोजी सध्या व्हायरल होत असलेला रेल्वेचा व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता.

या व्हिडिओसोबतच्या माहितीमध्ये स्पष्ट म्हटले आहे की, हा व्हिडिओ केवळ मनोरंजनासाठी बनवलेला असून, तो केवळ व्हिडिओ गेमचा एक भाग आहे. 

याचाच अर्थ की, हा काही खऱ्याखुऱ्या रेल्वेचा व्हिडिओ नाही. 

या चॅनेलवर रेल्वेचे असे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. 

रेल्वेचे असे व्हिडिओ युट्यूबवरील “Trainz Railroad Simulator 2019” नावाच्या सिम्युलेटरद्वारे तयार करण्यात येतात.

निष्कर्ष

व्हिडिओ गेममधील व्हिडिओला इस्रायलमधील पिरॅमिड पुलावरील रेल्वे म्हणून शेअर करण्यात येत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:इस्रायलमधील पिरॅमिड पुलावरील रेल्वेचा तो व्हिडिओ बनावट; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False