भाजपच्या झेंड्यावर गाय कापण्याचा व्हिडिओ कर्नाटकचा नसून मणिपूरचा आहे; वाचा सत्य

दिशाभूल करणाऱ्या I Misleading राजकीय

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक खोटे दावे शेअर केले जात आहे. अशाच एका व्हायरल व्हिडिओद्वारे दावा केला जात आहे की, कर्नाटकमध्ये मुस्लिमांनी भाजपच्या झेंड्यावर गाईची हत्याकरून काँग्रेसचा विजय साजरा केला. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ कर्नाटकमधील नाही. जुना व असंबंधित व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह शेअर केला जात आहे.

काय आहे दावा ?

व्हिडिओमध्ये भाजपच्या झेंड्यावर गाईचा गळा कापण्यात येत असल्याचे दिसते. हा व्हिडिओ शेअर करताना युजर्स कॅप्शनमध्ये लिहितात की, “कर्नाटकमध्ये काँग्रेस जिंकल्यामुळे विजयी साजरा करण्यासाठी मुस्लिम समाज भाजपच्या ध्वजावर गो हत्या करीत आहे, ही आहे काँग्रेसची सत्ता.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स ईमेज सर्च केल्यावर निशांत आजाद नावच्या ट्विटर अकाउंटवर व्हायरल व्हिडिओ 31 जानेवरी 2022 रोजी शेअर केलेला आढळला.

सोबत कॅप्शनमध्ये लिहिलेले होते की, “मणिपूर : मुस्लिमांनी भाजपच्या झेंड्यावर एका गायची कत्तल केली. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह आणि मणिपूर भाजपच्या अध्यक्षा शारदा देवी यांच्या बद्दल अपशब्द वापरले.”

विशेष बाब म्हणजे मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी या ट्विटला प्रतिउत्तर देत 1 फेब्रुवारी 2022 रोजी एका बातमीचे स्क्रिनशॉट शेअर केले होते.

या बातमीमध्ये लिहिले होते की, “भाजपच्या उमेदवारांच्या यादीवरून गायींची कत्तल केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. गाईची क्रूरतेने कत्तल केल्या प्रकरणी प्रतिबंधक कायदा 1960 अनुसार तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”

ते ट्विट आणि एन. बिरेन सिंह यांच्या अधिकृत अकांउट वरुन दिलेले प्रतिउत्तर आपण खाली पाहू शकतात.

भाजपच्या उमेदवारांच्या यादीवरून गाईची कत्तल केल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली होती.

मणिपूर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या तिकीटांच्या घोषणेचा निषेध म्हणून, नाझबेल हुसेन (38), अब्दुल रशीद (28), ओरैब खान यांनी (32) Thoubal जिल्ह्यातील Lilong गावात गाईची कत्तल केली.

तसेच या आरोपींनी भाजपचे नेते व मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन यांच्या विरोधात अपमानास्पद भाषा वापर केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. आपण संपूर्ण बातमी येथेयेथे पाहू शकतात.

मूळ पोस्ट – अवध टीव्ही

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ कर्नाटकमधील नाही. ही घटना गेल्या वर्षी मणिपूरमध्ये घडली होती. चुकीच्या दाव्यासह असंबंधित व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

(तुमच्याकडेदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर त्यांची सत्यता जाणून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. आमचे लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर वर फॉलो करा.)

Avatar

Title:भाजपच्या झेंड्यावर गाय कापण्याचा व्हिडिओ कर्नाटकचा नसून मणिपूरचा आहे; वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate 

Result: Misleading


Leave a Reply