कंडोमचे जुने आणि असंबंधित फोटो शहीन बागेच्या नावाने केले जात आहेत व्हायरल. वाचा सत्य

False राजकीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

दिल्लीतील शाहीन बाग येथे सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) विरोधात काही दिवसांपासून महिलांची निदर्शने सुरू आहेत. या आंदोलनाविषयी समाजमाध्यामांत अनेक अफवा आणि खोट्या बातम्या पसरविल्या जात आहेत. शाहीन बाग येथे कंडोमचा ढीग सापडल्याचा दावा सोशल मीडिया केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला.

काय आहे पोस्टमध्ये?

शाहीन बागेच्या मागच्या नाल्यात सफाई करताना नगरपालिकेच्या कर्मचारऱ्यांना कंडोमचा हा ढीग सापडला, असे पोस्टमध्ये म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) हा फोटो पाठवून याची पडताळणी करण्याची विनंती केली होती.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक 

तथ्य पडताळणी

शाहीन बागेपाशी खरंच कंडोमचा हा ढीग सापडला का याचा सोशल मीडियावर शोध घेतला. सर्वप्रथम हा फोटो गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की हा दावा खोटा आहे.

हा फोटो इंटरनेटवर 2014 पासून उपलब्ध असल्याचे कळाले. गुगलच्या रिझल्टनुसार Baomoi आणि ngamvn वेबसाईटवर हा फोटो अनुक्रमे 2016 आणि 2014 साली वापरण्यात आला होता.

Doi Song Phapluat नावाच्या वेबसाईटने मुलांच्या हॉस्टेलमध्ये कसे जीवन असते यासंबंधी 13 डिसेंबर 2016 रोजी एक लेख प्रकाशित केला होता. यामध्ये सदरील कंडोमच्या ढीगाचा फोटो वापरलेला आहे. 

ही एक व्हिएतनामी भाषेतील वेबसाईट आहे. हॉस्टेलमध्ये मुले कशाप्रकारे राहतात, त्यांच्या रुम कशा असतात, अस्ताव्यस्त कपडे आदींचे फोटो यामध्ये आहेत.

मूळ पोस्ट येथे वाचा – Doi Song Phapluat

निष्कर्ष

यावरून लक्षात येते की, हा फोटो अनेक व्हिएतनामी वेबसाईटवर 2014 पासून उपलब्ध आहे. हा नेमका कुठला आहे याची माहिती नसली तरी, हा फोटो शाहीन बाग आंदोलनाशी संबंधित नाही हे स्पष्ट होते. महाराष्ट्र टाईम्सनेदेखील याविषयी वृत्त दिले आहे.

Avatar

Title:कंडोमचे जुने आणि असंबंधित फोटो शहीन बागेच्या नावाने केले जात आहेत व्हायरल. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •