Fact : अंगणवाडी सेविकांवर लाठीमाराची ही घटना महाराष्ट्रातील नव्हे

False राजकीय | Political सामाजिक

अंगणवाडी सेविका वर? निर्दयपणे पोलिसांचा लाठीचार्ज?  *कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा*. ?⚔या सरकार जाहिर निषेध⚔? अशी माहिती Akash Pawar Patil यांनी पोस्ट केली आहे. अंगणवाडी सेविकांवर पोलिसांनी निर्दयपणे लाठीमार केल्याची ही घटना खरोखरच महाराष्ट्रात घडली आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. 

मूळ फेसबुक पोस्ट 

तथ्य पडताळणी 

अंगणवाडी सेविकांवर लाठीमार करण्याची ही घटना महाराष्ट्रात घडली का, याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यावेळी महाराष्ट्रात अंगणवाडी सेविकांवर लाठीमार करण्यात आल्याच्या अनेक जुन्या घटना दिसून आल्या. ही घटना मात्र महाराष्ट्रात घडल्याचे मात्र दिसून आले नाही. त्यानंतर आम्ही ही घटना नेमकी कुठे घडली याचा शोध घेण्यासाठी या व्हिडिओतील एक दृश्य घेत ते रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यावेळी आम्हाला द स्क्रोल या संकेतस्थळाने दिलेले खालील वृत्त दिसून आले. स्क्रोलने हे वृत्त देताना या घटनेचा व्हिडिओ देखील वापरला आहे. 

द स्क्रोल / Archive

न्यूज 18 हिंदीच्या संकेतस्थळानेही या घटनेचे वृत्त दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या घरास घेराव घालण्यासाठी जात असताना या महिलांवर लाठीचार्ज करण्यात आल्याचे या वृत्तात म्हटले आहे. संकेतस्थळानेही घटनेचा व्हिडिओ वृत्तासोबत दिला आहे. 

न्यूज 18 हिंदी / Archive 

अंगणवाडी सेविका सहाय्यिका संघ ही संघटना नेमकी कोणाशी संलग्न आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही संघटनेच्या संकेतस्थळास भेट दिली. त्याठिकाणी ही संघटना सिटूशी संलग्न असल्याचे दिसून आले. सिटू हे काय आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. तेव्हा सिटू ही संघटना भारतीय कम्यूनिस्ट पक्षाशी असल्याचे दिसून आले. त्यामुळे आम्ही महिलांवर लाठीमाराची ही घटना कुठे घडली हे जाणून घेण्यासाठी भारतीय कम्यूनिस्ट पक्षाचे महाराष्ट्रातील नेते प्रकाश रेड्डी यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी ही घटना रांची येथे घडल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांवर लाठीमार करण्यात आल्याच्या यासारख्या घटना यापूर्वी घडल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. 

झारखंड महिला काँग्रेसच्या सचिव दीपिका पांडे-सिंह यांनी याबाबत ट्विट करत या घटनेचा निषेध केला असल्याचेही आपण खाली पाहू शकता.

निष्कर्ष

अंगणवाडी सेविकांवर लाठीहल्ला करण्यात आल्याची ही घटना झारखंड राज्यातील रांची येथील आहे. ही घटना महाराष्ट्रातील असल्याचा दावा फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत असत्य आढळला आहे

Avatar

Title:Fact : अंगणवाडी सेविकांवर लाठीमाराची ही घटना महाराष्ट्रातील नव्हे

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False