FAKE NEWS: आदित्य ठाकरे आणि रेवती सुळे यांच्या साखरपुड्याची केवळ अफवाच!
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर ठाकरे आणि पवार कुटुंबांविषयी अनेक वावड्या उठू लागल्या. दोन्ही कुटुंबातील सदस्य कसे एकमेकांचे नातेवाईक आहेत किंवा होणार आहेत यासंबंधी मेसेज आणि पोस्ट फिरू लागल्या. अशाच एका मेसेजमध्ये म्हटले जात आहे की, खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती आणि आमदार आदित्य ठाकरे यांचा साखरपुडा होणार आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज व्हॉट्सअॅपवर (9049043487) पाठवून पडताळणी करण्याची विनंती केली.
काय आहे मेसेजमध्ये?
सोशल मीडियावर व्हायरल पोस्ट/मेसेजमध्ये लिहिलेले आहे की, आदरणीय श्री. शरदचंद्र पवार साहेबांनी सरकार बनवुन ठाकरे परिवार सत्येवर बसवले. त्याबरोबर त्यांनी नवीन सोयरीक पण जुळवली. थोड्याच दिवसात सुप्रियाची मुलगी रेवती व अदित्य ठाकरे यांचा साखरपुडा होणार आहे. आहे की नाही आजोबा ह्या नाहीतर त्या घरात सता कायम असली पाहिजे.
मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । फेसबुक
तथ्य पडताळणी
इंटरनेटवर यासंबंधी शोध घेतला असता अशी कोणतीही बातमी आढळली नाही. सध्याच्या तापलेल्या राजकीय वातावरणात अशी बातमी नक्कीच ब्रेकिंग न्यूज ठरली असती. परंतु, तसे काही दिसून आले नाही.
फॅक्ट क्रेसेंडोने सुप्रिया सुळे यांच्या जवळच्या मित्रपरिवाराशी संपर्क केला. आदित्य ठाकरे आणि रेवती सुळे यांच्या साखरपुड्याविषयीच्या बातम्या धदांत खोट्या असल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर राष्ट्रवादीच्या युवती काँग्रेसच्या अध्यक्षा व प्रवक्त्या आदिती नलावडे यांनी फॅक्ट क्रेसेंडोशी बोलताना हे मेसेजेस पूर्णतः खोटे असल्याचे सांगितले. “आदित्य ठाकरे व रेवती सुळे यांच्या साखरपुड्याची केवळ अफवा आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून ठाकरे व पवार कुटुंबियांसंदर्भात असे खोटे मेसेज फिरवले जात आहेत. युतीचे सरकार स्थापन न झाल्यामुळे शिवसेनेसमोर काँग्रेस-राष्ट्रवादीचा पर्याय होता. तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी चर्चा करून एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यामुळे कौटुंबिक संबंधांशी त्याला जोडणे अयोग्य आहे. म्हणून अशा पोस्टवर विश्वास ठेवू नये आणि त्या पसरवूदेखील नये,” असे आदिती नलावडे म्हणाल्या.
बाळासाहेब ठाकरे यांची बहिण व सुप्रिया सुळे यांच्या नात्याचीसुद्धा अफवा
फॅक्ट क्रेसेंडोशी बोलताना आदिती नलावडे यांनी पवार-ठाकरे कुटुंबियांसंबंधी फिरणाऱ्या आणखी एका मेसेजबद्दल सांगितले. त्या मेसेजमध्ये दावा केला आहे की, सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांचे मामा बाळासाहेब ठाकरे आहेत. “हा मेसेजदेखील खोटा आहे,” असे त्या म्हणाल्या.
निष्कर्ष
आदित्य ठाकरे व रेवती सुळे यांच्या लग्नाचे मेसेज खोटे आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष एकत्र येण्यामागे राजकीय भूमिका आहे. त्यामागे कौटुंबिक नातेसंबंध प्रस्थापित करण्याचा हेतू व आधार नाही, असे राष्ट्रवादीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
.hocal_container_hocal {
border: 2px solid #000;
background-color: #eee;
border-radius: 5px;
padding: 16px;
margin: 16px 0
}
.hocal_container_hocal::after {
content: "";
clear: both;
display: table;
}
.hocal_container_hocal img {
float: left;
margin-right: 20px;
border-radius: 50%;
}
.hocal_container_hocal span {
font-size: 20px;
margin-right: 15px;
}
@media (max-width: 500px) {
.hocal_container_hocal {
text-align: center;
}
.hocal_container_hocal img {
margin: auto;
float: none;
display: block;
}
}
Title:FAKE NEWS: आदित्य ठाकरे आणि रेवती सुळे यांच्या साखरपुड्याची केवळ अफवाच!
Fact Check By: Agastya Deokar
Result: False