पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वर्ध्या सभेतील निम्म्या खुर्च्या रिकाम्या होत्या का ? : सत्य पडताळणी

Mixture/अर्धसत्य राजकीय
 • 5
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  5
  Shares

सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 01 एप्रिल 2019 ला वर्धा येथे झालेल्या सभेचा आहे. या फोटोसंदर्भात वर्ध्यातील मोदींच्या सभेत मोदी बोलत असतांना अर्ध्यापेक्षा जास्त खुर्च्या रिकाम्या होत्या असा दावा करण्यात आला आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमकडून सत्य पडताळणी होईपर्यंत फेसबुकवर भारिप बहुजन महासंघ या पेजवर 894 वेळा शेअर, 1 हजार 300 व्हिव्युज, 117 कमेंटस् मिळाले आहेत.

फेसबुक

अर्काईव्ह

सत्य पडताळणी

व्हायरल होणारा फोटो फेसबुकच्या इतरही पेज आणि अकाउंटवरुन व्हायरल झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वर्धा येथील सभेसंदर्भात गुगलवर पंतप्रधान मोदी वर्धा सभा 01 एप्रिल 2019 असे टाईप केल्यानंतर इमेजेसमध्ये व्हायरल फोटो सारखा फोटो सापडला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्धा सभेविषयी इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियामध्ये विविध बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

सरकारनामाअर्काईव्ह

आपलं महानगरअर्काईव्ह

युट्यूबवर एबीपी माझा चॅनलवर 01 एप्रिल 2019 रोजी वर्धा येथे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला लोकांची गर्दी कमी या आशयाच्या बातमीचा व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे.

अर्काईव्ह

दैनिक प्रभात या फेसबुक पेजवर वर्धा येथील नरेंद्र मोदींच्या सभेत खुर्च्या रिकाम्याच असे वृत्त असलेला व्हिडिओ 01 एप्रिल 2019 ला अपलोड करण्यात आला आहे. परंतू या व्हिडिओमध्ये खुर्च्या रिकाम्या आहेत हे स्पष्टपणे दिसत नाही. केवळ रिकामी जागा दिसत आहे. खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये आम्ही रिकामी जागा स्पष्ट केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्याही ट्विटर अकाउंटवर वर्धा सभा विषयी मोठ्या प्रमाणात जनतेची उपस्थिती दिसून आली. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये 00.01 ते 2.15 सेकंदपर्यंत मोदींचे वर्धा येथील भाषण आणि सभेसाठी आलेले लोक हे दोन्ही दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये मोठ्या प्रमाणात लोक दिसून येत आहेत.

ट्विटर (पंतप्रधान नरेंद्र मोदी)

अर्काईव्ह

ट्विटरच्या बीजेपी लाईव्ह या पेजवरही पंतप्रधान मोदींच्या वर्धा येथील भाषणाविषयी वर नमूद केलेलाच व्हिडिओ 1 एप्रिल 2019 रोजी अपलोड करण्यात आलेला आहे.

ट्विटरवर पत्रकार अमेय तिरोडकर यांच्या अकाउंटवरुन एक फोटो प्रसिद्ध झालेला आहे. या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्धा सभेतील गर्दीचे दोन फोटो प्रसिद्ध झाले आहे. या फोटोतील कमेंटमध्ये एकाने ट्विटरवर प्रसिद्ध केलेल्या फोटोविषयी सभा सुरु असतानाचा दुसरा फोटो ट्विट केला आहे. अमेय तिरोडकर यांनी ट्विट केलेल्या फोटोला मिळालेला कमेंट फोटो हा चौकीदार देवेंद्र फडणवीस यांच्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवरही उपलब्ध आहे.  

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेतील फोटो बद्दल फॅक्ट क्रिसेंडो टीमने ट्विटरवर व्हायरल होणाऱ्या अमेय तिरोडकर यांच्या फोटोला मिळालेल्या कमेंट फोटोबद्दल खात्री करुन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्याही ऑफिशिअल ट्विटर अकाउंट आणि बीजेपी लाईव्ह या ऑफिशिअली ट्विटर अकाउंटवर अपलोड करण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्धा सभा याविषयी व्हिडिओ तपासला. या व्हिडिओला बारकाईने बघितल्यावर बाबुराव ताठे या व्यक्तीने व्हायरल केलेला फोटो आणि ऑफिशिअल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर अपलोड करण्यात आलेल्या व्हिडिओतील स्क्रिन शॉट सारखेच आहेत. त्यामुळे बाबुराव ताठे यांनी ट्विटरवर अपलोड केलेला फोटो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऑफिशिअल व्हिडिओतील स्क्रिन शॉट एकच आहेत. खाली दिलेल्या फोटोंच्या आधारे आपण हे सिद्ध स्पष्ट करत आहोत.  

ट्विटरअर्काईव्ह

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो संदर्भात संपुर्ण संशोधन केल्यानंतर असे समोर आले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्धा येथील सभेला 2014 च्या सभेच्या तुलनेत यावेळेला लोकांची गर्दी कमी दिसून आली. परंतू वर्धा सभेतील अर्ध्यापेक्षा जास्त खुर्च्या रिकाम्या होत्या असे चित्र फोटो, व्हिडिओ या माध्यमातून स्पष्टपणे जाणवले नाही. परंतू वर्धा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरु असतांना काही लोक सभा मैदानातून बाहेर जातानाचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. वर्धा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सुरु असताना सभा मैदानात लोकांची गर्दी कमी होत आहे, मैदान मोकळे आहे अशा आशयाचे फोटो आणि व्हिडिओ उपलब्ध आहेत. परंतू मैदानात लावण्यात आलेल्या अर्ध्यापेक्षा जास्त खुर्च्या रिकाम्या आहेत, अशा आशयाचे फोटो स्पष्टपणे सापडले नाहीत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्धा सभेत अर्ध्या पेक्षा जास्त खुर्च्या रिकाम्या होत्या असे निश्चित म्हणता येत नाही.

निष्कर्ष :  सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्धा सभेत अर्ध्यापेक्षा जास्त खुर्च्या रिकाम्या होत्या हे निश्चित म्हणता येत नसल्याने हे तथ्य संमिश्र आहे.

Avatar

Title:पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वर्ध्या सभेतील निम्म्या खुर्च्या रिकाम्या होत्या का ? : सत्य पडताळणी

Fact Check By: Amruta Kale 

Result: Mixture


 • 5
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  5
  Shares