Fact Check : इजिप्तमधील प्राध्यापक म्हणाले का, अल्लाह बलात्काराची परवानगी देतो?

False आंतरराष्ट्रीय सामाजिक

बघा बघा, असे लिहित कमलेश पेंडसे नावाने सोशल अवेरनेस ग्रुपवर मिस्र के अल अज़हर यूनिवर्सिटी की इस्लामी प्रोफेसर ने कहा है कि, “अल्लाह मुस्लिमो को गैर मुस्लिम महिला के रेप की इजाज़त देता है, और ये जायज है |” अशी पोस्ट शेअर करण्यात आली आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

Archive

तथ्य पडताळणी

या पोस्टमध्ये देण्यात आलेले छायाचित्र आम्ही ‘यांडेक्स’ इमेज सर्चद्वारे शोधले. त्यावेळी आम्हाला त्याचा खालील परिणाम मिळाला.

यापैकी  ‘Videoindirelim’  या संकेतस्थळावर आम्हाला हा व्हिडिओ मिळाला.

या संकेतस्थळावरुन 12 जानेवारी 2016 रोजी हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आल्याचे आपल्याला दिसत आहे. गैर-मुस्लिम युध्दबंदीवरील बलात्कारांचा बचाव करताना महिला इस्लामिक विद्वान असे शीर्षक देण्यात आल्याचेही या ठिकाणी दिसत आहे. या व्हिडिओच्या एका कोपऱ्यात ‘Memri TV’ असे लिहिलेले दिसत आहे. त्यानंतर आम्ही  ‘MemriTV’च्या संकेतस्थळावर गेलो. या दुरचित्रवाहिनीच्या संकेतस्थळावर आम्हाला 12 सप्टेंबर 2014 रोजीचा एक व्हिडिओ दिसून आला.

हा व्हिडिओ म्हणजे  ‘Videoindirelim’ द्वारे देण्यात आलेला व्हिडिओ आहे. या व्हिडिओत प्राध्यापक सुआद सलेह म्हणाल्या आहेत की, ‘’इस्लामच्या स्थापनेपुर्वी गुलामांची खरेदी करण्याची आणि त्यांना ठेवण्याची प्रथा होती. याची तुलना काही प्रमाणात आजच्या काळातील अवयव तस्करीशी करता येऊ शकते. इस्लामची स्थापना झाल्यावर याला लगाम घालण्यासाठी काही नियम करण्यात आले. केवळ ज्यांना युध्दात बंदी बनविण्यात आले आहे. त्यांनाच गुलाम किंवा दासी बनविता येऊ शकते. काही जण म्हणतात, मी आशियाच्या पुर्व भागात जाईल आणि आपल्यासाठी एक गुलाम मुलगी घेऊन येईल. पत्नीच्या संमतीने तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवेल. हे पुर्णपणे चुकीचे आहे. इस्लाममध्ये अशा चुकीच्या गोष्टींना स्थान नाही. आजकाल लोक अल्लाहने सांगितलेल्या प्रवचनांचे आणि परंपरांचे (कुराणात उल्लेख असलेल्या बाबींचे) उल्लंघन करत आहेत. आपण अशा लोकांपासून प्रभावित होऊ नये.’’

या पुर्ण व्हिडिओत त्यांनी कुठेही अल्लाह बलात्काराची परवानगी देतो, असे म्हटलेले नाही. हा व्हिडिओ आपण खाली पाहू शकता.

https://www.memri.org/tv/al-azhar-professor-suad-saleh-legitimate-war-muslims-can-capture-slavegirls-and-have-sex-them

ArchivedLink

निष्कर्ष :

अल्लाह बलात्काराची परवानगी देतो, असे इजिप्तमधील प्राध्यापक सुआद सलेह यांनी म्हटलेले नाही. आपण चुकीच्या लोकांपासून प्रभावित होऊ नये, असे आवाहनही त्यांनी केलेले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत त्यांच्याबद्दल सोशल मीडियावर प्रसारित होत असलेली पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact Check : इजिप्तमधील प्राध्यापक म्हणाले का, अल्लाह बलात्काराची परवानगी देतो?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False