विश्वजीत कदम यांनी केला भाजपच्या वाटेवर असल्याचा इन्कार

False Headline राजकीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

विश्वजीत कदम भाजपच्या वाटेवर? मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, अशी माहिती InShorts Marathi ने आपल्या पेजवर पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. 

फेसबुक / Archive

तथ्य पडताळणी

विश्वजीत कदम यांनी खरोखरच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली का? हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला त्यावेळी त्यांच्या फेसबुक पेजवर आम्हाला खालील माहिती दिसून आली.

फेसबुक / Archive 

विश्वजीत कदम हे खरंच भाजपच्या वाटेवर आहेत का, याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला महाराष्ट्र टाईम्सने 29 मे 2019 रोजी प्रसिध्द केलेले वृत्त आम्हाला दिसून आले. यात विश्वजित कदम यांनी आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचा खुलासा केल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्र टाईम्स / Archive

दैनिक लोकसत्ताने 29 मे 2019 रोजी प्रसिध्द केलेल्या वृत्तात विश्वजीत कदम यांचे याबाबतचे म्हणणे मांडले आहे. यात विश्वजीत कदम यांनी भाजपत प्रवेश करणार असल्याचं वृत्त खोटं असल्याचं सांगितलं आहे. 

दैनिक लोकसत्ता / Archive

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एक भाजपत आला तर कुणाला आश्चर्य वाटायला नको, असे विधान केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना विश्वजीत कदम म्हणाले होते की, पतंगराव कदम यांनी 40 वर्ष काँग्रेसमध्ये काढली आहेत. मीदेखील काँग्रेससोबत एकनिष्ठ आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण करण्याची गरज नाही. दैनिक लोकमतने 18 जुलै 2019 रोजी याबाबतचे वृत्त प्रसिध्द केले होते. 

दैनिक लोकमत / Archive

दरम्यान आम्ही याबाबत विश्वजीत कदम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी ते भाजपच्या वाटेवर असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. पुरग्रस्तांना व्यवस्थित मदत मिळावी यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे स्पष्ट केले. 

निष्कर्ष  

काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी पुरग्रस्तांना व्यवस्थित मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपच्या वाटेवर असल्याच्या वृत्ताचाही त्यांनी इन्कार केला आहे. त्यामुळे विश्वजीत कदम भाजपच्या वाटेवर ही बाब फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत असत्य आढळून आली आहे.

Avatar

Title:विश्वजीत कदम यांनी केला भाजपच्या वाटेवर असल्याचा इन्कार

Fact Check By: Ajikya Khadse 

Result: False Headline


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •