विराट कोहली यांच्या आई आणि भावाने धीरेंद्र शास्त्रींची खरंच भेट घेतली का ? वाचा सत्य
भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीच्या कुटुंबाने वादग्रस्त बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते, असा दावा करण्यात येत आहे. सोबत पुरावा म्हणून एक व्हिडिओसुद्धा शेअर केला जात आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील व्यक्ती आणि महिला विराट कोहलीचे कुटुंबीय नाहीत.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये धीरेंद्र शास्त्रींसमोर एक युवक आणि महिला बसलेले आहेत. शास्त्री यांनी त्यांना कुठून आले विचारल्यावर तो तरुण दिल्लीच्या पश्चिम विहार येथून आल्याचे सांगतो. यानंतर व्हिडिओमध्ये व्हॉईस ओव्हर सुरू होतो आणि त्यात सांगितले जाते की, हा युवक विराट कोहलीचा भाऊ असून सोबत त्यांची आई आहे. आईचे आजारपण आणि व्यावसायिक अपयश येत असल्यामुळे ते धीरेंद्र शास्त्रींकडे उपायासाठी आले होते.
मुळ पोस्ट - फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ 10 डिसेंबर 2022 रोजी उत्तर प्रदेशमधील छतारी येथे पार पडलेल्या धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमाचा आहे. बागेश्वर धामच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे.
‘निगेटीव इनर्जी से परेशान दिल्ली से आए युवक को मिला आशीर्वाद’ अशा शीर्षकाच्या व्हिडिओमध्ये धीरेंद्र शास्त्री या युवकाला ‘सनी’ नावाने मंचावर बोलवतात. यामध्ये कुठेही हा युवक आणि महिला विराट कोहलीचे कुटुंबीय आहेत असा उल्लेख नाही.
फॅक्ट क्रेसेंडोने बागेश्वर धामचे जनसंपर्क अधिकारी कमल अवस्थी यांच्याशी संपर्क साधून या व्हिडिओ व्हिडिविषयी विचारणा केली. त्यांनी स्पष्ट केले की, व्हिडिओतील लोक विराट कोलहलीचा भाऊ व आई नाहीत. त्यांनी हेसुद्धा सांगितले की, विराट कोहली किंवा त्यांच्या कुटुंबाने कधीही बागेश्वर धामला भेट दिलेली नाही.
विराट कोहलीचे कुटुंब
विराट कोहलीच्या आईचे नाव सरोजा कोहली असून मोठ्या भावाचे नाव विकास कोहली आहे.
खालील तुलनात्मक फोटो पाहिल्यावर लक्षात येईल की, व्हायरल व्हिडिओमधील महिला आणि युवक आणि विराट कोहलीची आई आणि भाऊ वेगवेगळे आहेत.
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होत की, व्हायरल व्हिडिओमधील युवक आणि महिला विराट कोहली यांची आई आणि भाऊ नाहीत. चुकीच्या दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)
.hocal_container_hocal {
border: 2px solid #000;
background-color: #eee;
border-radius: 5px;
padding: 16px;
margin: 16px 0
}
.hocal_container_hocal::after {
content: "";
clear: both;
display: table;
}
.hocal_container_hocal img {
float: left;
margin-right: 20px;
border-radius: 50%;
}
.hocal_container_hocal span {
font-size: 20px;
margin-right: 15px;
}
@media (max-width: 500px) {
.hocal_container_hocal {
text-align: center;
}
.hocal_container_hocal img {
margin: auto;
float: none;
display: block;
}
}
Title:विराट कोहली यांच्या आई आणि भावाने धीरेंद्र शास्त्रींची खरंच भेट घेतली का ? वाचा सत्य
Fact Check By: Sagar Rawate
Result: False