सत्य पडताळणी : सर्जिकल स्ट्राईकमध्ये या महिला पायलटने घेतला सहभाग

False

फेसबुकवरील वेदिका सुर्वे या ग्रुपवर एका भारतीय महिला पायलटचा फोटो शेअर होत आहे. या महिला पायलटने बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रावर झालेल्या हल्ल्यात भाग घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. या दाव्याची सत्य पडताळणी फॅक्ट क्रिसेन्डोने केली आहे. वेदिका सुर्वे या कम्यूनिटीला 5 हजार 707 लाईक्स असून तिला 5 हजार 742 जण Follow करत आहेत. या पोस्टला 314 लाईक्स असून ही पोस्ट 80 जणांनी शेअर केली आहे. या पोस्टवर 32 प्रतिक्रिया आल्या आहेत.

आक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी  

गुगल रिव्हर्स इमेज सर्चद्वारे शोध घेतला असता हा फोटो अवनी चर्तुवेदी यांचा असल्याचे स्पष्ट होते. त्या मिग 21 विमान चालविणा-या पहिल्या महिला पायलट असल्याचेही दिसून येते.

यू टयूबवरही अवनी चतुर्वेदी यांचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओतही त्या भारताच्या पहिल्या महिला लढावू विमानाच्या वैमानिक असल्याचे म्हटले आहे. या व्हिडिओ 20 हजार 355 व्ह्यूव्ज आहेत.

एनडीटीव्हीनेही 22 फेब्रवारी 2018 रोजी अवनी चतुर्वेदी यांच्याविषयीचे वृत्त दिले आहे. या वृत्तातही त्या पहिल्या महिला लढावू विमानाच्या वैमानिक असल्याचे म्हटले आहे.

आक्राईव्ह लिंक

स्कूपवूपनेही 22 फेब्रवारी 2018 रोजी अवनी चतुर्वेदी यांच्याविषयीचे वृत्त दिले आहे. या वृत्तातही त्या पहिल्या महिला लढावू विमानाच्या वैमानिक असल्याचे म्हटले आहे.

आक्राईव्ह लिंक

निष्कर्ष

अवनी चतुर्वेदी यांनी बालाघाट येथील दहशतवादी तळावर हवाई हल्ला केल्याचे आम्हाला कुठेही आढळले नाही. त्यामुळे त्यांनी या हवाई हल्ल्यामध्ये भाग घेतल्याचे वृत्त चुकीचे/असत्य असल्याचे फॅक्ट क्रिसेन्डोच्या तथ्य पडताळणीत आढळून आले आहे.

Avatar

Title:सत्य पडताळणी : सर्जिकल स्ट्राईकमध्ये या महिला पायलटने घेतला सहभाग

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False