हॉस्पिटलमध्ये पायला बेड्या ठोकलेल्या ज्येष्ठाचा तो फोटो स्टॅन स्वामी यांचा नाही; वाचा सत्य

False राजकीय

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात अटक असलेले फादर स्टॅन स्वामी यांचे सोमवारी (5 जुलै) निधन झाले. यानंतर सोशल मीडियावर हॉस्पिटल बेडवर बेड्या ठोकलेल्या एका वयोवृद्ध व्यक्तीचा फोटो व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, हा फोटो फादर स्टॅन स्वामी यांचा आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा फोटो फादर स्टॅन स्वामी यांचा नाही. 

काय आहे दावा?

हॉस्पिटलमध्ये पायाला बेड्या घातलेल्या एका वयोवृद्ध व्यक्तीच्या फोटोसोबत कॅप्शन आहे की, “फादर स्टॅन स्वामी या मानवतावादी 84 वर्षाचे वयोवृध्द,मानवतावादी सामाजिक कार्यकर्ते यांचा हा फोटो पाहून आपल्याला राग येत नाही का ? हा फोटो पाहून मला संपात येतोय. एवढे आजारी फादर  काय पळून जाणार आहेत का ? पुरोगामी भारत देशाला हे शोभत नाही. मोदी सरकारचा अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघा च्या वतीने जाहीर निषेध..!”

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

सदरील फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, या फोटोतील व्यक्ती फादर स्टॅन नाहीत. या व्यक्तीचे नाव बाबूराम प्रधान असे आहे.

‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या 13 मे रोजीच्या बातमीनुसार, उत्तर प्रदेशमधील बाबूराम प्रधान (92) यांना काही महिन्यांपूर्वी एका खून प्रकरणी अटक करण्यात आली होती. दरम्यान, त्यांची तब्येत ढासळल्यानंतर त्यांना इटाह शहरातील सरकारी दवाखान्यात भरती करण्यात आले होते.

येथे त्यांच्या पायाला दवाखान्यातील खाटेवरच बेडी लावण्यात आली होती, त्याचा हा फोटो आहे.

एनडीटीव्ही वेबसाईटवरील बातमीचा स्क्रीनशॉट

‘एनडीटीव्ही’च्या बातमीनुसार, हा फोटो व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेशमधील अतिरिक्त पोलीस महासंचालक (तुरुंग) आनंद कुमार प्रकरणी संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित केले. 

1982 साली एका व्यक्तीचे अपहरण करून त्याची हत्या केल्या प्रकरणी बाबूराम यांना आजन्म कारावासाची शिक्षा झालेली आहे. दरम्यान, पॅरोलवर बाहेर आल्यानंतर त्यांच्या  पॅरोलवरील याचिका फेटाळून लावण्यात आली. त्यामुळे 6 फेब्रुवारी रोजी त्यांची पुन्हा तुरुंगात रवानगी करण्यात आली.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, उत्तर प्रदेशमधील खून प्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या बाबूराम प्रधान यांचा फोटो फादर स्टॅन यांच्या नावे व्हायरल होत आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:हॉस्पिटलमध्ये पायला बेड्या ठोकलेल्या ज्येष्ठाचा तो फोटो स्टॅन स्वामी यांचा नाही;

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False