न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी देश कोरोनोमुक्त झाल्याने मंदिरास भेट दिली का? वाचा सत्य

Coronavirus False सामाजिक

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा ऑर्डन यांनी कोरोनामुक्त झाल्यानंतर तेथील एका मंदिरात भेट दिल्याचा म्हणून सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. न्यूझीलंड कोरोनामुक्त झाल्याने जेसिंडा ऑर्डन यांनी मंदिराला भेट दिली का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

फेसबुक पोस्ट / फेसबुक पोस्ट / संग्रहित 

तथ्य पडताळणी

screenshot-www.dnaindia.com-2020.08.13-15_15_38.png

न्यूझीलंड कोरोनामुक्त झाल्याने न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा ऑर्डन यांनी मंदिराला भेट दिली का, याचा शोध घेतला. त्यावेळी डीएनए या इंग्रजी वृत्तपत्राच्या संकेतस्थळाने दिलेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार राष्ट्रीय स्तरावरील निवडणूकीअगोदर न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा ऑर्डन यांनी ऑकलंडमधील राधा-कृष्ण मंदिराला भेट दिली आहे.

डीएनए / संग्रहित

झी न्यूजनेही याबाबत दिलेल्या वृत्तात ही निवडणुक पुर्व भेट असल्याचे म्हटले आहे. हिंदूस्थान टाईम्सने त्यांच्या युटूयूब चॅनलवर याबाबत दिलेले वृत्तही दिसून आले. सप्टेंबर 2020 मध्ये न्यूझीलंडमध्ये निवडणुक होणार असून त्यापूर्वी जेसिंडा ऑर्डन यांनी ऑकलंडमधील राधा-कृष्ण मंदिराला भेट दिल्याचे या वृत्तात म्हटले आहे. 

संग्रहित

भारतीय राजदूत मूक्तेश परदेशी यांनी देखील याबाबत ट्विट केले असून त्यात त्यांनी न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा ऑर्डन यांनी राधा-कृष्ण मंदिराला भेट दिल्याचे आणि त्याठिकाणी पुरी, छोले आणि डाळीचा आस्वाद घेतल्याचे म्हटले आहे. या ट्विटमध्ये कुठेही न्यूझीलंड कोरोनामुक्त झाल्याने त्यांनी मंदिरास भेट दिल्याचे म्हटलेले नाही.

संग्रहित

यातून हे स्पष्ट झाले की, न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा ऑर्डन यांनी निवडणुकीपुर्वी मंदिराला ही भेट दिलेली आहे. न्यूझीलंड कोरोनामुक्त झाल्याने मंदिराला भेट दिल्याचे असत्य आहे. याखेरीज न्यूझीलंडमध्ये कोरोनाचे नवे रुग्णही आढळले असल्याचे वृत्त आहे.

निष्कर्ष

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा ऑर्डन यांनी न्यूझीलंड कोरोनामुक्त झाल्याने मंदिराला भेट दिल्याचे असत्य आहे.

Avatar

Title:न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी देश कोरोनोमुक्त झाल्याने मंदिरास भेट दिली का? वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False