डॉ. रियाज यांच्या मृत्यूची खोटी पोस्ट व्हायरल. ते जिवंत आहेत. वाचा सत्य

Coronavirus False आंतरराष्ट्रीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

दिल्लीमध्ये कोरोना संक्रमित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉ. उस्मान रियाज नामक एका डॉक्टरचा मृत्यू झाल्याच्या पोस्ट सध्या खूप व्हायरल होत आहेत. रुग्णसेवेसाठी स्वतःचे प्राण गमावणाऱ्या या डॉक्टरच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी या दाव्याची तथ्य पडताळणी करण्याची विनंती केली. 

फॅक्ट क्रेसेंडच्या पडताळणीत हा दावा चुकीचा आढळला. डॉ. रियाज जिवंत असून, ते दुबईत कार्यरत आहेत.

काय पोस्टमध्ये?

riaz.png

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

तथ्य पडताळणी

सदरील फोटोला रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा फोटो दिल्लीत काम करणाऱ्या डॉक्टरचा नाही. 

हा फोटो दुबई येथील अ‍ॅस्टर हॉस्पिटलमधील डॉ. रियाज उस्मान यांचा आहे. त्यांनी 2009 साली बंगुळूरू येथील राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथून एमबीबीएसची पदवी मिळवली. काही वर्षे केरळमध्ये प्रॅक्टिस केल्यानंतर ते दुबईला स्थायिक झाले. दुबईतील अ‍ॅस्टर क्लिनिकमध्ये 2016 पासून ते कार्यरत आहेत.

Riaz-1.png

मूळ माहिती येथे वाचा – हेल्थ गोअ‍ॅस्टर क्लिनिक

मग आम्हाला डॉ. उस्मान रियाज यांनी स्वतःच्या फेसबुक अकाउंटवरून केलेली फेसबुक पोस्ट आढळली. यामध्ये त्यांनी सोशल मीडियावर केले जाणारे सगळे दावे, मेसेजेस आणि पोस्ट खोट्या असल्याचे सांगितले. ते जिवंत असून, अशा खोट्या बातम्यांवर विश्वास न ठेवण्याचे तसेच त्या न पसरविण्याचे आवाहन केले आहे.

image3.png

मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुक

यानंतर फॅक्ट क्रेसेंडोने दिल्ली आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी कोणत्याही डॉक्टरचा कोरोनाचा उपचार करताना मृत्यू झाला नाही असे सांगितले. यावरून स्पष्ट होते की, सोशल मीडियावर केले जाणारे सगळे दावे खोटे आहेत.

पाकिस्तानात एका डॉक्टरचा मृत्यू

पाकिस्तानात डॉ. उस्मान रियाज नामक एका डॉक्टरचा कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत्यू झालेला आहे. इराणमधून आलेल्या लोकांची तपासणी करताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती, अशी माहिती गिलगित प्रभागातर्फे देण्यात आली आहे. पाकिस्तानात सुरक्षा उपकरणांची कमतरता असल्याची सध्या ओरड सुरू आहे. 

निष्कर्ष

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो दुबईतील डॉ. रियाज उस्मान यांचा आहे. ते जिवंत आहेत. त्यामुळे दिल्लीमध्ये त्यांचा कोरोनाचा उपचार करताना मृत्यू झाल्याचा दावा खोटा आहे.

Avatar

Title:डॉ. रियाज यांच्या मृत्यूची खोटी पोस्ट व्हायरल. ते जिवंत आहेत. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •