सिंधुदुर्गमध्ये तापसरीची साथ सुरु आहे का? : सत्य पडताळणी

False आरोग्य

(संग्रहित छायाचित्र)

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्या पोस्टमध्ये सिंधुदुर्गमध्ये तापसरीची साथ सुरु आहे असा दावा करण्यात आला आहे. त्यासोबतच एका बातमीचे फोटो देखील व्हायरल करण्यात आलेला आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमकडून सत्य पडताळणी होईपर्यंत ही पोस्ट फेसबुकवर प्रशांत प्रकाश परब यांच्या अकाउंटवरुन व्हायरल झाली आहे.

फेसबुक

अर्काईव्ह  

सत्य पडताळणी

व्हायरल होणाऱ्या पोस्ट संदर्भात गुगलवर तापसरीचे थैमान असे सर्च केले. त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये तापसरीचे प्रमाण या विषयावर विविध वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्या वृत्तपत्रांचा आधारे सिंधुदुर्ग आणि कोकण परिसरात 2010 पासून 2017 पर्यंत (मोठ्या कालांतराच्या गॅपनंतर) तापसरीने लोकांचा मृत्यू झाल्याचा उल्लेख आढळून येतो.

दैनिक महाराष्ट्र टाईम्सअर्काईव्ह

दैनिक प्रहारअर्काईव्ह

व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये जो बातमीचा फोटो देण्यात आला आहे, ती बातमी 12 नोव्हेंबर 2017 रोजीची आहे.

दैनिक प्रहारअर्काईव्ह

दैनिक कोकण टुडेअर्काईव्ह

व्हायरल होणाऱ्या पोस्टमधील बातमीचा फोटो प्रशांत परब यांच्या ट्विटर अकाउंटवरुनही अपलोड करण्यात आला आहे.

ट्विटर

अर्काईव्ह

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये जो बातमीचा फोटो देण्यात आला आहे. त्यासंदर्भात युट्युबवर सिंधुदुर्ग लाईव्ह, कोकण नाऊ चॅनलवर 11 नोव्हेंबर 2017 रोजी व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे.

अर्काईव्ह

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये सिंधुदुर्गमध्ये तापसरीची साथ सुरु आहे, असे म्हटले आहे. या विषयी फॅक्ट क्रिसेंडो टीमने सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य केंद्राशी संपर्क केला.

सध्या सिंधुदुर्गमध्ये तापसरीची साथ सुरु नाही. आपल्या भागात तरी सध्या काही साथ वगैरे सुरु नाही. पण सावंतवाडी परिसरात काही तुरळक रुग्णांना कधी कधी तापसरीचा त्रास होताना दिसून आले आहे. वर्तमानकाळात सिंधुदुर्ग परिसरात कुठेही तापसरीची साथ सुरु नाही.

दिलीप मळये,

आरोग्य सहाय्यक,

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग.

व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये उल्लेख करण्यात आलेली सिंधुदुर्गमध्ये तापसरीची साथ हे वृत्त 2017 मधील आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये तापसरीची साथ सुरु असताना असे म्हटले आहे. परंतु सध्या सिंधुदुर्गमध्ये तापसरीची साथ सुरु नाही. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमधील तथ्य जुने असून सध्यस्थितीत खोटे आहे.

निष्कर्ष :  सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये सिंधुदुर्गमध्ये तापसरीची साथ सुरु आहे असे  लिहिण्यात आहे. पोस्टसंदर्भात फॅक्ट क्रिसेंडो टीमकडून सत्य पडताळणी केल्यानंतर असे आढळून आले की, पोस्टमध्ये देण्यात आलेल्या बातमीचा फोटो आणि तापसरीच्या साथीबद्दल केलेला उल्लेख हा वर्तमानकाळातील नसून, 2017 मधील घटनेचा आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणारी पोस्ट सिंधुदुर्गमध्ये तापसरीची साथ हे तथ्य सध्यस्थितीत खोटे आहे.

Avatar

Title:सिंधुदुर्गमध्ये तापसरीची साथ सुरु आहे का? : सत्य पडताळणी

Fact Check By: Amruta Kale 

Result: False