इंदूरमधील होळीचा व्हिडिओ कसबा पेठेतील विजयी रवींद्र धंगेकर यांची ही मिरवणूक म्हणून व्हायरल

False राजकीय | Political

नुकतेच पार पडलेल्या कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून  काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर 11 हजार मतांनी विजयी ठरले. यानंतर हजारोंच्या संख्येने गुलाल उधळत जल्लोष करणाऱ्या लोकांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, आमदार धंगेकर यांनी काढलेल्या जंगी विजयी मिरवणुकीचा हा व्हिडिओ आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. 

पडताळणअंती कळाले की, हा व्हिडिओ इंदूरमधील होळी उत्सवाचा आहे. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

काय आहे दावा ? 

लोकांवर गुलालाची बेभान उधळण होतानाचा व्हिडिओ शेयर करून म्हटले आहे की, “कसबा पेठेतील विजयी जल्लोष.”

मूळ पोस्ट — फेसबुक | आर्काइव्ह | इंस्टाग्राम

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ मध्यप्रदेशातील इंदूर शहराचा आहे.

व्हायरल वीडियोमधील गुलाल उधळणारी मशीन आहेत तशीच मशीन आयबीसी-24 नावाच्या युट्यूब चॅनेलवरील बातमीतही दिसते. या बातमीनुसार, हे दृश्य इंदूरमधील होळीच्या ‘गेर’ आयोजनतील आहे.

हा धागा पकडून आम्ही इंदूरमध्ये ही जागा कुठे असू शकते याचा शोध घेतला. इंदूर जिल्हा प्रशासनाच्या वेबसाईटवर आम्हाला व्हायरल व्हिडिओत दिसणाऱ्या जागेचा फोटो मिळाला. डिजी मेकर्स नावाच्या एका इन्स्टाग्राम पेजवरून सर्वप्रथम हा फोटो 25 मार्च 2019 रोजी शेअर करण्यात आला होता. 

फॅक्ट क्रेसेंडोने ‘डिजी मेकर्स’चे सहसंस्थापक शुभम यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, वरील फोटो इंदूरमधील राजवाडा चौकातील आहे. तसेच व्हायरल व्हिडिओसुद्धा इंदूरचाच आहे.

वरील फोटो आणि व्हायरल व्हिडिओ यामध्ये दिसणारी इमारत एकच आहे. खाली दिलेल्या तुलनेत हे स्पष्ट दिसते. 

एवढेच नाही तर, डिजी मेकर्सद्वारे शेयर करण्यात आलेल्या फोटोमध्ये उजवीकडील वरच्या कोपऱ्यात जी पांढरी इमारत दिसते ती गणेस कॅप मार्टची बिल्डिंग आहे. 

गुगल मॅपवर शोध घेतला असता इंदरूमधील गणेश कॅप मार्टचे लोकेशन टॅग केलेल फोटोसुद्धा सापडले. खाली दिलेल्या तुलनेतून स्पष्ट होते की हा फोटो इंदूरमधीलच आहे. 

कसबा पेठेतील मिरवणूक

कसबा पेठ विधानसभा निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांचा विजय झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत रविंद्र धंगेकरांवर जेसीबीतून फुले आणि गुलालाची वर्षाव करत जोरदार विजयाचा जल्लोष साजरा केला.

मिरवणुकीचे फोटो आपण खाली पाहू शकतात.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ कसब्यातील नसून इंदूरमधील झालेल्या होळी उत्सवाचा आहे. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:इंदूरमधील होळीचा व्हिडिओ कसबा पेठेतील विजयी रवींद्र धंगेकर यांची ही मिरवणूक म्हणून व्हायरल

Fact Check By: Sagar Rawate 

Result: False