अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी मोदी सरकार विरोधात वक्तव्य केले आहे का? : सत्य पडताळणी

True अर्थव्यवस्था

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी मोदी सरकार आने के बाद गलत दिशा की और बढा देश अमर्त्य सेन असे म्हणाले असे म्हटले आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमने सत्य पडताळणी करेपर्यंत या पोस्टला विनोद सोनटक्के या फेसबुक अकाउंटवर 226 शेअर, 130 लाईक्स मिळाले आहेत.

फेसबुक

अर्काईव्ह

सत्य पडताळणी

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमधील मोदी सरकार आने के बाद गलत दिशा की और बढा देश हे वाक्य आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी म्हटले आहे का हे तपासण्यासाठी फॅक्ट क्रिसेंडो टीमने गुगलवर अमर्त्य सेन स्टेटमेन फॉर नरेंद्र मोदी असे सर्च केले.

अमर्त्य सेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकार यांच्या संदर्भात प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे. या विषयी विविध माध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. खाली दिलेल्या लिंकवर आपण सविस्तर बातमी वाचू शकता.

द इकॉनॉमिक टाईम्सअर्काईव्ह

द इंडियन एक्सप्रेसअर्काईव्ह

फ्रॉल डॉट ईनअर्काईव्ह

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये मोदी सरकार आने के बाद गलत दिशा की और बढा देश :  अमर्त्य सेन हा दावा खरा आहे. आंतरराष्ट्रीय अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी 08 जुलै 2018 रोजी भारत और उसके विरोधाभास या हिंदी पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा कार्यक्रमाच्या वेळी बोलले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणारे मोदी सरकार आने के बाद गलत दिशा की और बढा देश :  अमर्त्य सेन हे तथ्य खरे आहे.

निष्कर्ष :  सोशल मीडियावर व्हायरल होणारी पोस्ट मोदी सरकार आने के बाद गलत दिशा की और बढा देश :  अमर्त्य सेन यामध्ये अमर्त्य सेन यांनी मोदी सरकार संदर्भात वरील वाक्य म्हटलेले आहे. त्यामुळे पोस्टमधील मोदी सरकार आने के बाद गलत दिशा की और बढा देश :  अमर्त्य सेन हे तथ्य खरे आहे.

Avatar

Title:अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी मोदी सरकार विरोधात वक्तव्य केले आहे का? : सत्य पडताळणी

Fact Check By: Rajesh Pillewar 

Result: True