जगातील फक्त 140 देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाला आहे का? वाचा सत्य

Coronavirus False आंतरराष्ट्रीय | International सामाजिक

जगात फक्त 140 देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झालेला आहे. मोदींनी 150 देशांना मदत केली आहे. पुढेमागे कोरोनाचा संसर्ग झाला तर दहा देशांना अगोदरच मदत करून ठेवली आहे, असा संदेश सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. कोरोना विषाणूचा प्रसार केवळ 140 देशांमध्ये झाला आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

screenshot-www.facebook.com-2020.07.25-12_45_56.png

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी

जगातील फक्त 140 देश कोरोनाग्रस्त आहेत का, भारताने दीडशे देशांना मदत केली आहे का, हे जाणून घेण्यासाठी शोध घेतला. त्यावेळी आज तक या हिंदी वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावर 17 जुलै 2020 रोजी प्रसिध्द झालेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या 75 व्या स्थापनादिनानिमित्त संबोधित करताना कोरोनाविरूध्दच्या लढ्यात भारताने 150 हून अधिक वैद्यकीय व अन्य स्वरूपाची मदत केल्याचे सांगितले.

image3.png

आज तकचे वृत्त / संग्रहित

त्यानंतर जगात फक्त 140 देश कोरोनाग्रस्त आहेत का, याचा शोध घेतला. त्यावेळी WORLDOMETERS वर असलेल्या आकडेवारीनुसार जगातील 213 देश हे कोरोनाग्रस्त आहेत. 

image4.png

WORLDOMETERS / संग्रहित

कोरोनासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने दिलेली  22 जुलै 2020 रोजीची ताजी आकडेवारीही आपण खाली पाहू शकता. या आकडेवारीनुसार 213 देश सध्या कोरोनाग्रस्त आहेत.

https://www.who.int/docs/default-source/coronaviruse/situation-reports/20200722-covid-19-sitrep-184.p 

या माहितीतुन हे स्पष्ट झाले की, सध्या जगभरात 213 देश कोरोनाग्रस्त आहेत.

निष्कर्ष

जगभरात फक्त 140 देश कोरोनाग्रस्त आहेत हा दावा असत्य आहे. जगभरात 213 देश कोरोनाग्रस्त आहेत. भारताने 150 हून अधिक देशांना वैद्यकीय आणि अन्य मदत केली आहे.

Avatar

Title:जगातील फक्त 140 देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाला आहे का? वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False