उदयनराजे भोसले भोसले यांनी प्रितम मुंडेंना पाठिंबा दिला का? : सत्य पडताळणी

False राजकीय | Political

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये बीड येथील लोकसभा 2019 भाजप उमेदवार प्रितम मुंडे यांना उदयनराजे भोसले भोसले यांनी पाठिंबा दिला असल्याचा फोटो व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रिसेंटो टीमने सत्य पडताळणी करेपर्यंत ही पोस्ट फेसबुकवर पंकजाताई – प्रितमताई मुंडे फॅन क्लब या पेजवर व्हायरल झाली आहे. या पोस्टला 1 हजार 100 लाईक्स, 61 शेअर मिळाल्या आहेत.

फेसबुक

अर्काईव्ह

सत्य पडताळणी

ही पोस्ट सोशल मीडियावर फेसबुकवर इतरही पेज आणि अकाउंटवरुन व्हायरल झाली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्ट राष्ट्रवादी नेते उदयनराजे भोसले हे भाजप बीड लोकसभा उमेदवार प्रितमताई मुंडे यांना पाठिंबा देत आहेत या आशयाची आहे. या विषयी गुगलवर फॅक्ट क्रिसेंडो टीमने उदयनराजे भोसले सपोर्ट प्रितम मुंडे असे सर्च केले. याविषयी विविध वृत्तपत्र आणि माध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

बिझनेस स्टॅंडर्डअर्काईव्ह

द फ्री प्रेसअर्काईव्ह

व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये नमूद केलेले असल्याप्रमाणे माझ्या नावाचा वापर बीडच्या उमेदवार प्रितमताई मुंडे यांना पाठिंबा असल्याच्या बातमीसोबत जोडले जात आहे. परंतू मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाशी निगडित आहे असे त्यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

फॅक्ट क्रिसेंडो टीमने राष्ट्रवादी नेते उदयनराजे भोसले यांच्या ऑफिशिअल फेसबुक अकाउंटवर सर्च केले. त्यांच्या नावाचा वापर हा बीड लोकसभा 2019 भाजप उमेदवार यांना माझा पाठिंबा या आशयाने होत आहे. या विषयावर त्यांनी त्यांच्या ऑफिशिअल फेसबुक अकाउंटवर एक पत्र अपलोड केले आहे. या पत्रात त्यांनी हे स्पष्टपणे सांगितले आहे की, अफवांवर विश्वास ठेवू नये. बीड मतदार संघाशी माझे नाव जोडून मतदारांची दिशाभूल करण्यात येत आहे असे त्यांनी या पत्रातून स्पष्ट केले आहे.

फेसबुक

अर्काईव्ह

उदयनराजे भोसले यांचा बीड लोकसभा 2019 भाजप उमेदवार प्रितमताई मुंडे यांना पाठिंबा या पोस्टमधील दावा खोटा आहे. या संदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते उदयनराजे भोसले यांनी स्वतःच्या ऑफिशिअल फेसबुक अकाउंटवर स्पष्टीकरणार्थ पत्र दिले आहे. या पत्रात त्यांनी स्वतः असे म्हटले आहे की, माझ्या नावाचा वापर करुन मतदारांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे यापत्राद्वारे त्यांनी कोणत्याही प्रकारचा पाठिंबा दिला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

निष्कर्ष :  सोशल मीडियावर व्हायरल होणारी पोस्ट उदयनराजे भोसले यांचा प्रितमताई मुंडे यांना पाठिंबा या पोस्टमधील दावा खोटा आहे. स्वतः उदयनराजे भोसले यांनी यासंदर्भात जाहीर पत्राद्वारे जनतेला स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे व्हायरल होणारी पोस्ट खोटी आहे.

Avatar

Title:उदयराजे भोसले यांनी प्रितम मुंडेंना पाठिंबा दिला का? : सत्य पडताळणी

Fact Check By: Amruta Kale 

Result: False