पाकिस्तानातील व्हिडियो इस्लामपूरमधील कोरोनाबाधित फॅमिलीचा म्हणून व्हायरल. वाचा सत्य

Coronavirus False

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहरात एकाच कुटुंबात 12 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यामुळे सगळीकडे खळबळ माजली आहे. या कुटुंबाचा व्हिडियो म्हणून सोशल मीडियावर 20 सेंकदाची एक क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिलेला श्वसनास त्रास होत असल्याचे दिसते. ही क्लिप खरंच इस्लामपूरमधील आहे का याची फॅक्ट क्रेसेंडोच्या अनेक वाचकांनी विचारणा केली.

फॅक्ट क्रेसेंडोने याबाबत पडताळणी केली असता हा व्हिडियो पाकिस्तानातील असल्याचे समोर आले.

काय आहे व्हिडियोमध्ये?

20 सेंकदाच्या व्हायरल क्लिपमध्ये एक बुरखाधारी महिलेला श्वसनास त्रास होताना दिसतो. पोस्टकर्त्याने सोबत लिहिले की, पाहा हे सांगलीतील इस्लामपूरमधील कोरोना फॅमिली.

मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम व्हिडियोचे बारकाईने निरीक्षण केल्यावर दिसते की, दवाखान्याच्या बोर्डवर उर्दू भाषेतून लिहिलेले आहे. हा व्हिडियो नेमका कुठला आहे हे तपासण्यासाठी यातील की-फ्रेम्स निवडून गुगलवर रिव्हर्स इमेज सर्च केल्या. त्यातून समोर आलेल्या परिणामांतून कळाले की, हा व्हिडियो इस्लामपूर तर नाहीच पण भारतातीलसुद्धा नाही.

पाकिस्तानातील जिओ न्यूजचे पत्रकार मुर्तजा अली शहा यांनी हा व्हिडियो ट्विट केला आहे. यामध्ये त्यांनी हा व्हिडियो पाकिस्तानमधील असल्याचे म्हटले. कोरोनाचा धोका सरकारने गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे मत त्यांनी या व्हिडियोद्वारे व्यक्त केले.

अर्काइव्ह

त्याचबरोबर हा व्हिडियो पाकिस्तानमधील अनेकांनी शेयर करीत आरोग्य सुविधांच्या अभावाचा प्रश्न उपस्थित केला. पाकिस्तानातील डॉ. हुमा सईफ यांनीदेखील हा व्हिडियो शेयर करीत म्हटले की, कोरोना संकटाच्या काळात डॉक्टरांकडे सुरक्षेचे उपकरण, मास्क वगैर साधनसामुग्री नाही.

अर्काइव्ह

याट्विटला उत्तर देताना फैसल नईम नामक युजरने माहिती दिली की, हा व्हिडियो पाकिस्तानच्या पंजाबप्रांतातील अब्दूल हकीम भागातील दवाखान्यातील आहे. तिच्यावर Upper respiratory tract infection (URTI) संबंधी उपचार करण्यात आल्यावर तिला सोडण्यात आले. तिला ताप किंवा खोकला नव्हता. केवळ श्वसनास त्रास होत होता. तिचे काही नातेवाईक दुबईहून आल्याचेही कळाले.

tweetjflsdkjf.png

मूळ ट्विट येथे पाहा – ट्विटरट्विटर

यानंतर फॅक्ट क्रेसेंडोने फैसल नईम यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, हा व्हिडियो पाकिस्तानमधील आहे. तो भारतातील नाही. पाकिस्तानातील अब्दुल हकीम भागातील ग्रामीण आरोग्य केंद्रातील हा व्हिडियो असून, या दवावखान्यात मी डॉक्टर आहे. या महिलेची चाचणी करण्यात आली असता तिला कोरोनाची लागण झाली नसल्याचे सिद्ध झाले.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, इस्लामपूर येथील कोरोनाबाधित कुटुंबाचा व्हिडियो म्हणून जी क्लिप फिरत आहे ती पाकिस्तानमधील नाही. तसेच व्हिडियोतील महिलेला कोरोनाची लागण झालेली नव्हती.

Avatar

Title:पाकिस्तानातील व्हिडियो इस्लामपूरमधील कोरोनाबाधित फॅमिलीचा म्हणून व्हायरल. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False