कोरोनाने एकाचा मृत्यू झाल्याचे कर्नाटकच्या आरोग्य विभागाने म्हटलंय का? वाचा सत्य

Coronavirus False वैद्यकीय सामाजिक

भारतात कर्नाटकात कोरोनाने एकाचा मृत्यू झाल्याचे कर्नाटकच्या आरोग्य विभागाने म्हटल्याचा दावा करत समाजमाध्यमात सध्या माहिती पसरत आहे. कर्नाटकात कोरोनाचा पहिला बळी. कोरोना या रोगाने संपूर्ण जगात धुमाकूळ घातलेला आहे. कर्नाटकातही रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाचा कर्नाटकातील पहिला बळी गुलबर्गा येथील व्यक्ती ठरल्याची माहिती कर्नाटक सरकारच्या आरोग्य विभागाने जारी केली आहे. कर्नाटक सरकारने गुलबर्गा येथील आरोग्यधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात हे उघड झाले आहे. महम्मद हुसेन सिद्दीकी (वय 76) असे मयताचे नाव आहे. सौदी अरेबिया येथून तो परतला होता. सरकारने आदेश काढून अंत्यविधीसाठी ची सर्व व्यवस्था चोख करण्याची सूचना केली आहे, अशी माहिती Belgaum Live या पेजवरही पोस्ट करण्यात आली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

ONE DIED WITH CORONA VIRUS IN KARNATKA CLAIM.png

फेसबुकवरील मुळ पोस्ट

तथ्य पडताळणी

कर्नाटकात कोरोना विषाणूची लागण झाल्याने कुणाचा मृत्यू झाला का, हे जाणून घेण्यासाठी आम्ही शोध घेतला. कर्नाटक सरकारच्या संकेतस्थळावर आम्हाला अशी माहिती जारी केलेली आढळली नाही. त्यानंतर झी न्यूज या वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळाने दिलेले वृत्त आम्हाला दिसून आले. या वृत्तात यात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या एका संशयिताचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. या व्यक्तीचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच या व्यक्तीचा नेमका कशामुळे मृत्यू झाला हे स्पष्ट होईल असे म्हटले आहे.

screenshot-zeenews.india.com-2020.03.11-18_00_43.png

झी न्यूजचे वृत्त / Archive

टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीने आपल्या संकेतस्थळावर याबाबतचे वृत्त देताना हा कोरोना संशयिताचा मृत्यू असून कर्नाटकातील आरोग्य आयुक्तांनी हा ‘कोरोना बळी’ असल्याच्या वृत्ताचा इन्कार केल्याचे म्हटले आहे. ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे.

screenshot-www.tv9marathi.com-2020.03.11-18_20_55.png

टीव्ही 9 मराठीचे वृत्त / Archive

‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने नेमकं काय म्हटलंय हे देखील आपण खाली पाहू शकता. 

Archive

यातून हे स्पष्ट झाले की, कर्नाटकात कोरोनाचा पहिला बळी गेल्याची माहिती कर्नाटक सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेली नाही. कर्नाटकातील व्यक्तीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप दुमत आहे. 

निष्कर्ष 

कर्नाटकात कोरोनाचा पहिला बळी गेल्याची माहिती कर्नाटक सरकारच्या आरोग्य विभागाने दिल्याचे असत्य आहे. या रुग्णाच्या नमुन्यांची तपासणी सध्या सरकार करत आहे.

Avatar

Title:कोरोनाने एकाचा मृत्यू झाल्याचे कर्नाटकच्या आरोग्य विभागाने म्हटलंय का? वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False