उत्तराखंडमधील वणव्याचे म्हणून जुने आणि असंबंधित फोटो व्हायरल. वाचा सत्य

False सामाजिक

गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये वणवा पेटलेला आहे. आगीने रौद्ररुप धारण केल्यामुळे वनसंपदा आणि प्राणीमात्रांची हानी झाली आहे. या वणव्याचे फोटो म्हणून सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता कळाले की, यातील अनेक फोटो जुने आणि बाहेर देशातील असल्याचे आढळले.

काय आहे पोस्टमध्ये?

Uttarakhand-1.png

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकफेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

व्हायरल होत असलेल्या फोटोंना गुगल रिव्हर्स इमेज सर्चद्वारे शोधले असता कळाले की, यातील अनेक फोटो जुने आहेत. एका-एका फोटोचे सत्य पाहुया…

फोटो क्र. 1

photo-1.jpg

वर्षः 2007

स्थानः पेलोपिनिजी बेट, ग्रीस

सत्यः ग्रीसमध्ये ऑगस्ट 2007 मध्ये भीषण आग लागली होती. यामद्ये 62 जणांचे बळी गेले होते.  हा फोटो पेलोपिनिज बेटावरील वणव्याचा आहे.

मूळ फोटो येथे पाहा – न्यूज वायर


फोटो क्र. 2

photo-22.jpg

वर्षः 2000

स्थानः बिटररूट नॅशनल पार्क, अमेरिका

सत्यः अमेरिकेतील मॉन्टॅना येथील बिटररूट नॅशनल पार्कमध्ये लागलेल्या भीषण आगीचा हा फोटो आहे. जॉन मॅकोलगन या छायाचित्रकाराने तो 6 ऑगस्ट 2000 रोजी टिपला होता.

मूळ फोटो येथे पाहाः विकिमीडिया


फोटो क्र. 3

photo-3.jpg

वर्षः 2016

स्थानः उत्तराखंड, भारत

सत्यः 2016 साली एप्रिल महिन्यात उत्तराखंडमधील 13 जिल्ह्यांमध्ये वणवा पेटला होता. हा फोटो अरुण शर्मा यांनी 30 एप्रिल 2016 रोजी काढला होता.

मूळ फोटो येथे पाहाः गेटी इमेजेस


फोटो क्र. 4

photo-4.jpg

वर्षः 2016

स्थानः अनिश्चित

सत्यः हा फोटो 2016 सालापासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. म्हणजे हा फोटो किमान 4 वर्षे जुना आहे. 

मूळ फोटो येथे पाहाः ई-उत्तराखंड


फोटो क्र. 5

photo-5.jpg

वर्षः 2018

स्थानः अनिश्चित

सत्यः हा फोटो विविध मीडिया वेबसाईट्सवर उत्तराखंडमधील वणव्यांच्या बातम्यांमध्ये 2018 पासून वापरण्यात येत असल्याचे आढळले. त्यामुळे हा फोटो किमान 2 वर्षे तरी जुना आहे.

मूळ फोटो येथे पाहाः इंडिया टुडे

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले फोटो उत्तराखंडमध्ये सध्या पेटलेल्या वणव्याचे नाहीत. हे सर्व फोटो जुने आणि यातील काही बाहेर देशातील आहेत. 

हे देखील वाचा

अ‍ॅमेझॉनच्या जंगलातील आगीचे फोटो म्हणून जुने आणि संदर्भहीन फोटो व्हायरल. वाचा सत्य

ऑस्ट्रेलियातील वणव्यात होरपळलेले प्राणी म्हणून जुने व असंबंधित फोटो व्हायरल. वाचा सत्य

Avatar

Title:उत्तराखंडमधील वणव्याचे म्हणून जुने आणि असंबंधित फोटो व्हायरल. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False