
आता बँकांमध्ये पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे. बँक ऑफ बडोदा यांची सुरूवात 1 नोव्हेंबर 2020 पासून करत आहे, असा दावा सध्या समाजमाध्यमात करण्यात येत आहे. या दाव्याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.
काय आहे दावा?
यापूर्वी एसएमएस सेवा, धनादेशाचा वापर, एटीएम आदी सुविधांसाठी शुल्क आकारण्यात येत होते. आता बँकेत चौथ्यादा पैसे जमा केल्यास 40 रूपये शुल्क आकारण्यात येणार आहे
तथ्य पडताळणी
आता बँकांमध्ये पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे का, याचा शोध घेण्यासाठी सर्वप्रथम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संकेतस्थळास भेट दिली. याठिकाणी अशी कोणतीही माहिती आढळून आली नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ट्विटर खात्यावरही अशी कोणतीही माहिती नसल्याचे दिसून आले. बॅंक ऑफ बडोदाच्या संकेतस्थळावर आणि ट्विटर खात्यावरही अशी कोणतीही माहिती आढळून आली नाही. बँक विविध सुविधांवर कशा प्रकारे शुल्क आकारणी करते याची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे दिसून आले. ती खाली देत आहोत.
247_1_webmaster-chart-revision-of-basic-service-charges-wef-01-07-2020त्यानंतर पत्र सुचना कार्यालयाने याबाबत केलेले एक ट्विट दिसून आले. या ट्विटमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, जनधन खात्यातून पैसे काढण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. बॅंक ऑफ बडोदानेही बचत खात्यातून पैसे काढण्यावर आणि जमा करण्यावर असलेल्या शुल्कात कोणताही वाढ केलेली नाही.
निष्कर्ष
बँकांमध्ये पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार असल्याचा दावा असत्य आहे.

Title:बँकेत पैसे जमा करण्यास, काढण्यास अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार असल्याचा दावा खोटा; वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
