
जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये नोव्हेंबरपासून शुल्कवाढीवरून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. तेव्हापासून ‘जेएनयू’ हॉस्टेलचे दर आणि त्याबदल्यात मिळणाऱ्या सुविधा याविषयी अनेक दावे करण्यात आले आहेत. असाच एक दावा म्हणजे तेथील विद्यार्थ्यांना दरमाह 10 रुपयांमध्ये आलिशान हॉस्टेल रुम मिळतात. सोशल मीडियावर ‘जेएनयू’तील एका कथित आलिशान रुमचा फोटो शेयर करून त्याची तुलना रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिटाशी केली जात आहे. रेल्वेस्थानकावर 10 रुपयांत केवळ दोन तासांसाठी प्लॅटफॉर्म तिकिट मिळते. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची पडताळणी केली आहे.
काय आहे पोस्टमध्ये?
एकीकडे 10 रुपयांचे दोन तासांचे प्लॅटफॉर्म तिकिट आणि दुसरीकडे ‘जेएनयू’तील 10 रुपये प्रतिमहिन्याच्या एका कथित आलिशान रुमचा फोटो देऊन म्हटले की, आमच्या टॅक्सचा असा उपयोग होत आहे, तर का भरावा आम्ही टेक्स?

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम पोस्टमधील आलिशान रुमच्या फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून कळाले की, हा फोटो ‘जेएनयू’च्या हॉस्टेलमधील नाही. स्ट्डेंट्स इन नामक विद्यार्थ्यांना लक्झरी रुम्स उपलब्ध करून देणाऱ्या कंपनीच्या शक्तीनगर (दिल्ली) भागातील रुमचा फोटो. त्यांच्या वेबसाईटवर सदरील रुमचे दोन फोटो उपलब्ध आहेत. ते तुम्ही खाली पाहू शकता.

मूळ फोटो येथे पाहा – फोटो क्र 1 । फोटो क्र. 2
यावरू हे तर स्पष्ट होते की, पोस्टमधील आलिशान रुमचा फोटो ‘जेएनयू’च्या हॉस्टेलमधील नाही. हा फोटो एका खासगी कंपनीच्या शक्तीनगर स्टुडेंट्स इन हाऊसिंगमधील आहेत.
मग जेएनयूमधील हॉस्टेलमधील रुम कशा असतात?
फॅक्ट क्रेसेंडोने जेएनयू हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या काही विद्यार्थ्यांशी संपर्क साधला. ‘एसएफआय’चा जनरल सेक्रेटरी मयूख बिस्वास, जेएनयू विद्यार्थी संघाची पूर्व अध्यक्ष गीता कुमारी आणि अक्षत सेठ नामक विद्यार्थ्याने व्हायरल होत असेलेले आलिशान रुमचे फोटो पाहून ते जेएनयूतील नसल्याचे सांगितले. तसेच त्यांनी हॉस्टेल रुमचे फोटोदेखील पाठवले. ते तुम्ही खाली पाहू शकता.

निष्कर्ष
जेएनयू हॉस्टेल म्हणून व्हायरल होणाऱ्या आलिशान रुमचा फोटो मूळात एका खासगी कंपनीच्या पीजीचा आहेत. तो चुकीच्या दाव्यासह शेयर केला जात आहे. त्यामुळे पोस्टमध्ये करण्यात आलेला दावा असत्य ठरतो.

Title:खासगी कंपनीच्या आलिशान रुमचे फोटो JNU हॉस्टेलचे म्हणून होत आहेत व्हायरल. वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
