
हिटलर आणि मोदी या दोघांमध्ये याचे साम्यस्थळ म्हणून त्यांची तुलना करणारे एक छायाचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या छायाचित्राची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.
तथ्य पडताळणी
हिटलर आणि मोदी या दोघांमध्ये साम्यस्थळ असण्याचे सांगणारे हे छायाचित्र आम्ही गुगल रिव्हर्स सर्चवर शोधले असता आम्हाला हिटलरचे खालील मूळ छायाचित्र दिसुन आले.

एक्स्प्रेस डॉट युके या संकेतस्थळावरही ही छायाचित्रे दिसून आली. हिटलरच्या प्रचारतंत्राचा भाग म्हणून त्यांच्या व्यक्तीमत्वाचा पैलू म्हणून ही छायाचित्रे वेळोवेळी जारी करण्यात येत होती, असे याबाबतच्या वृत्तात म्हटले आहे. त्यानंतर आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे छायाचित्र खरे आहे का? याची पडताळणी केली. त्यावेळी आम्हाला आऊटलूक या साप्ताहिकाच्या संकेतस्थळावर पंतप्रधान मोदींचे हे छायाचित्र दिसून आले. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या अतुल यादव यांनी हा फोटो काढला असल्याचे या फोटोखाली लिहिलेले आहे.

फॅक्ट क्रेसेंडोने या वृत्ताची तथ्य पडताळणी यापूर्वी 16 जुलै 2018 रोजी इंग्रजीत केलेली आहे.
निष्कर्ष
हिटलर आणि मोदी या दोघांचे साम्यस्थळ म्हणून व्हायरल होत असलेले हे छायाचित्र तपासले असता यातील हिटलरच्या छायाचित्रात फेरबदल करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य असल्याचे दिसून आले आहे.

Title:सत्य पडताळणी : मोदींची हिटलरशी तुलना करणारे हे छायाचित्र खरे आहे का?
Fact Check By: Dattatray GholapResult: False
