“आता विसाव्याचे क्षण” हे लता मंगेशकरांचे शेवटचे गाण्याचे रेकॉर्डिंग आहे का?

False सामाजिक

सोशल मीडियावर भारताच्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे “आता विसाव्याचे क्षण” हे शेवटचे गाण्याचे रेकॉर्डिंग आहे अशा आशयाची पोस्ट वायरल होत आहे. फॅक्ट क्रिसेंडोने केली याविषयीची सत्य पडताळणी.

फेसबुकअर्काईव्ह

सोशल मीडियावर लता मंगेशकर यांचे “आता विसाव्याचे क्षण” हे शेवटचे रेकॉर्डिंग आहे, असे पोस्टमध्ये म्हटले आहे. पोस्टमध्ये “आता विसाव्याचे क्षण” या गाण्याचा एक व्हिडिओ देण्यात आला असून, आपल्या लाडक्या लता मंगेशकर यांनी आपल्या वयाच्या 90 व्या वर्षी त्यांच्या आयुष्यातील शेवटचे गाणे रेकॉर्ड केले असे लिहिलेले आहे.

या पोस्टसंदर्भात सत्य शोधण्यासाठी आम्ही गुगलवर लता मंगेशकर यांचे “आता विसाव्याचे क्षण” असे सर्च केले. त्यानंतर असे लक्षात आले की, “आता विसाव्याचे क्षण” हे गीत गीतकार बा.भ.बोरकर यांचे आहे. या गाण्याला संगीत दिले आहे सलील कुलकर्णी यांचे तर लता मंगेशकर यांनी हे गाणे गायले आहे. हे गीत क्षण अमृताचे या अल्बम / चित्रपटातील 2013 मधील आहे.

गीत मंजुशा डॉट कॉमअर्काईव्ह

लता मंगेशकर यांनी संगीत गाण्याच्या क्षेत्रातून निवृत्ती आता विसाव्याचे क्षण या गाण्याने घेतली अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर पसरत आहे हे जेव्हा लता मंगेशकर यांना कळाले तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांना स्पष्टीकरण दिले.

डेलीहंटअर्काईव्ह

न्यूज डॉगअर्काईव्ह

द इंडियन एक्सप्रेसअर्काईव्ह  

भारतीय गानकोकिळा लता मंगेशकर यांनी त्यांच्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवर यासंदर्भात 13 डिसेंबर 2018 रोजी ट्विट अपलोड करण्यात आले आहे.

लता मंगेशकर यांना इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रासाठी दिलेल्या मुलाखतीमध्ये असे म्हटले आहे की, कवी बा.भ. बोरकर यांची कविता मी कधीच गायलेले नाही म्हणून मी त्या कवितेसाठी गाणे गायले आहे. परंतू सध्याच्या काळात या गाण्याचा वापर करुन चुकीच्या अर्थाने अफवा पसरविण्यात येत आहे. पुढे आपल्या मुलाखतीमध्ये त्या म्हणतात की, चित्रपटासाठी मी गाणे गाणं काही वर्षांपासून थांबविले आहे. कारण वर्तमान काळातील सध्याच्या चित्रपट संगीताशी मी कनेक्ट होऊ शकत नाही. त्यामुळे चित्रपटासाठीचे गाणे गाणं मी थांबवले आहे. परंतू (नॉन-फिल्मी) चित्रपट संगीताच्या व्यतिरिक्त इतर प्रकारातील सर्व गाण्याच्या प्रकारात मी गाणे गात आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी गाणे गाणारच आहे. मंगेशकर परिवार हा गाणे-संगीत याशिवाय जगूच शकत नाही. आमच्या आयुष्यातून संगीत काढून टाकले तर आमचं आयुष्य हे आयुष्यच राहत नाही.

युट्युबवर टाईम्स म्युझिक स्पिरिच्ट्युअल या चॅनलने 27 मे 2014 रोजी लता मंगेशकर यांनी गायलेले आता विसाव्याचे क्षण हे गाणे अपलोड केले आहे. खाली दिलेल्या लिंकवर आपण हे गाणे पाहू शकता.

निष्कर्ष :  “आता विसाव्याचे क्षण”  हे लता मंगेशकर यांनी रेकॉर्ड केलेले शेवटचे गाणे यासंदर्भात आपल्या लाडक्या लता मंगेशकर यांनी आपल्या वयाच्या 90 व्या वर्षी त्यांच्या आयुष्यातील शेवटचे गाणे रेकॉर्ड केले पोस्टमध्ये लिहिण्यात आलेला हा मजकूर असत्य आहे.

Avatar

Title:“आता विसाव्याचे क्षण” हे लता मंगेशकरांचे शेवटचे गाण्याचे रेकॉर्डिंग आहे का?

Fact Check By: Amruta Kale 

Result: False