काय आहे 999 रुपयांच्या खादी मास्क मागचे सत्य? वाचा

False राजकीय

कोरोनापासून संरक्षण म्हणून मास्क वापरणे गरजेचे आहे. जागतिक आरोग्य संघटनेपासून ते आरोग्य मंत्रालयापर्यंत सर्वांनी मास्क घालण्याचा सल्ला दिल्यामुळे बाजारात विविध प्रकारचे मास्क विक्रीसाठी आले आहेत. पंतप्रधान नरेंद मोदींच्या फोटोसह ‘खादी मास्क’ नावानेदेखील सोशल मीडियावर जाहिरात सुरू आहे. तीन खादी मास्कच्या पॅकची किंमत 999 रुपये एवढी महाग आहे. 

याद्वारे अनेक जण केंद्र शासनावर अव्वाच्या सव्वा किंमत लावून लूटमार करीत असल्याचा आरोप करीत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता कळाले की, केंद्र सरकारचा या जाहिरातीशी काही संबंध नाही.

काय आहे पोस्टमध्ये?

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

खादी मास्क नेमके कोणी तयार केले याचा शोध घेतला. खादी व ग्रामोद्योग आयोगाने (केवीआईसी) माहिती दिल्याचे आढळले की, चंदिगढ येथील खुशबू नावाची एक महिला अवैधरीत्या ‘खादी मास्क’ नावाने मास्क विक्री करीत होती. विनापरवानगी पंतप्रधानांचा फोटो वापरून लोकांची दिशाभूल केल्यामुळे तिच्याविरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली.

अर्काइव्ह

अमर उजालाच्या बातमीनुसार, ही महिला मास्कच्या बॉक्सवर ‘मेक इन इंडिया’ आणि ‘व्होकल फॉर लोकल’ असे लोगो छापून विक्री करीत असे. खादी व ग्रामोद्योग आयोगाला याची माहिती मिळाल्यावर तिच्याविरोधात तक्रार देण्यात आली.

मूळ बातमी येथे वाचा – अमर उजाला

खादी व ग्रामोद्योग आयोगातर्फे मास्कची विक्री केली जाते. आयोगाने ट्विट करीत माहिती दिली की, खादी किंवा केवीआईसीच्या नावे विक्री केल्या जाणाऱ्या इतर महागड्या मास्कच्या जाहिरातींना बळी पडू नका. आयोगातर्फे केवळ 30 रुपयांपासून मास्क उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, पंतप्रधानांच्या फोटोचा गैरवापर करून खादी मास्क नावाने एक महिला अवैधरीत्या महागड्या दराने मास्क विक्री करीत होती. या मास्कशी खादी आयोग किंवा केंद्र शासन यांचा काही संबंध नव्हता. उलट माहिती मिळताच आयोगाने त्या महिलेविरोधात पोलिसांत तक्रार दिली.

Avatar

Title:काय आहे 999 रुपयांच्या खादी मास्क मागचे सत्य? वाचा

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False