Fact check : ही व्यक्ती बलात्काराचा आरोप झालेला RSS नेता आहे का?

Mixture राजकीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना धमकी देत बलात्कार करणाऱ्या RSS च्या दोन वरिष्ठ नेत्यांना पोलिसांनी अटक केल्याची पोस्ट Quazi Ameenuddin यांनी शेअर केली आहे. ही मुळ पोस्ट Politics in India या पेजवरील आहे. या पोस्टमध्ये देण्यात आलेली माहिती आणि छायाचित्र सत्य आहे का याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

फेसबुक / Archive 
तथ्य पडताळणी 

भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना धमकी देत बलात्कार करणाऱ्या RSS च्या दोन वरिष्ठ नेत्यांना पोलिसांनी अटक केली आहे का हे शोधण्यासाठी आम्ही two rss senior leaders arrested for rape of bjp woman workers असे टाकले. त्यावेळी आम्हाला खालील रिझल्ट दिसून आला.

या रिझल्टमधील निकालात आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या एका नेत्याला भाजपच्या एका महिला कार्यकर्त्यावर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आल्याचे वृत्त दिसून आले. या वृत्तातच पुढे आणखी एका व्यक्तीवर याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे म्हटले आहे. आरोप करणाऱ्या महिलेने या प्रकरणात तिघांचे नाव घेतल्याचे या वृत्तात म्हटले आहे. 

न्यूज 18 डॉट कॉम / Archive

यानंतर न्यूज 18 डॉट कॉमने या घटनेचे फॉलोअप देणारे वृत्त पण प्रकाशित केल्याचे दिसून येते. त्यात या आरोपीची न्यायालयीन कोठडी रवानगी करण्यात आल्याचे म्हटले आहे. 

न्यूज 18 डॉट कॉम / Archive

तिसरी जंग या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात या बातमीबरोबर या पोस्टमध्ये दिलेले छायाचित्र वापरले आहे. या खाली स्पष्टपणे DEMO PIC, not related to the news असे लिहिल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे हे वृत्त जवळपास दहा महिन्यानंतर 29 जून 2019 रोजी देण्यात आले आहे. हे वृत्त hardikpatel.blog वरुन घेण्यात आल्याचेही यात म्हटले आहे. 

तिसरी जंग / Archive

हे छायाचित्र क्रॉप करुन रिव्हर्स इमेज सर्चद्वारे शोध घेतला असता हे अभिनेते असल्याचे एका ट्विटमध्ये लिहिलेले दिसून आले. युटूयूबवरील खालील व्हिडिओत हे दृश्य दिसून आले.

व्हिडिओत सात मिनिटे पाच सेकंदाला तुम्ही हे दृश्य पाहू शकता. 

निष्कर्ष

भाजपच्या महिला कार्यकर्ती सोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या नेत्यांनी बलात्कार केल्याची घटना गतवर्षी घडलेली आहे. ही घटना 2019 मध्ये जून महिन्यात घडलेली नाही. या पोस्टमध्ये दाखविण्यात आलेले छायाचित्र भाजप नेत्याचे नसून अभिनेत्याचे आहे. हे एका मालिकेच्या भागातील दृश्य आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणी ही पोस्ट संमिश्र स्वरुपाची आढळली आहे. 

Avatar

Title:Fact check : ही व्यक्ती बलात्काराचा आरोप झालेला RSS नेता आहे का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: Mixture


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •