तथ्य पडताळणी : हा व्हिडियो खरंच इस्रायलकडून मिळणाऱ्या तंत्रज्ञानाचा आहे का?

False राष्ट्रीय

सोशल मीडियावरील एका व्हायरल व्हिडियोमध्ये इस्रायलकडून भारताला मिळणाऱ्या सैन्य तंत्रज्ञान कसे असेल हे दाखविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड बुलेटीनच्या (PCBToday.in) फेसबुक पेजवरून 28 फेब्रुवारी रोजी हा व्हिडियो पोस्ट करण्यात आला आहे. 6.15 मिनिटांच्या या व्हिडियोमध्ये दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी भविष्यात वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाची झलक दाखविण्यात आल्याचे म्हटले आहे. याची फॅक्ट क्रेसेंडोने याची तथ्य पडताळणी केली.

PCBToday.in फेसबुक अर्काइव्ह

पडताळणी करेपर्यंत हा व्हिडियो एक लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. यासह इतर फेसबुक पेजवरूनदेखील हा व्हिडियो शेयर करण्यात आलेला आहे.

तथ्य पडताळणी

सदरील व्हिडियो नीट पाहिल्यास यामध्ये एक वाॅटरमार्क दिसतो. त्यामध्ये SEMENOV DAHIR KURMANBIEVICH असे लिहिलेले दिसून येते.

फेसबुकवर हे नाव सर्च केले असता हा व्यक्ती रशियाचा असल्याचे कळाले. दाहीर सेमेनोव्ह नावाने ओळखला जाणारा हा व्यक्ती इस्नानबुलमध्ये वास्तव्यास आहे.

फेसबुक प्रोफाईल-अर्काइव्ह

इनव्हर्स या संकेतस्थळावरील एका लेखात त्याला रशियन इंजिनियर आणि इन्व्हेंटर म्हटले आहे.

मूळ लेख येथे वाचा – इनव्हर्सअर्काइव्ह

त्याचे Dahir Insaat या नावाचे यूट्यूब चॅनेलदेखील आहे. त्यावर आम्हाला 23 मार्च 2016 रोजी अपलोड केलेला एक कन्सेप्ट व्हिडियो आढळला. तो तुम्ही खाली पाहू शकता.

हा व्हिडियो आणि सध्या सोशल मीडियावर इस्रायलचे तंत्रज्ञान म्हणून व्हायरल असलेला व्हिडियो सारखाच आहे.

दाखीर सेमेनोव्ह हा  Dahir Insaat Corporation या कंपनीचा संचालक असून त्याच्या यूट्यूब चॅनेलवर अशाप्रकारचे अनेक कन्सेप्ट व्हिडियोज आहेत.

पुलवामा हल्ल्यानंतर इस्रायलने भारताला दहशतवादाच्या विरोधात पूर्णपणे सहकार्य करण्याची भूमिका घेतली, असे वृत्त AIR  ने दिले होते. (अर्काइव्ह)

तसेच 12 फेब्रुवारी रोजी ANI या वृत्तसंस्थेने भारत इस्रायलकडून 55 ड्रोन खरेदी करणार असल्याची बातमी दिली होती. (अर्काइव्ह)

परंतु याच्याशी संबंधित व्हिडियोचा काहीच संबंध नाही.

निष्कर्ष

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीतून हे स्पष्ट होते की, हा व्हिडियो इस्रायलकडून भारताला मिळणाऱ्या तंत्रज्ञानाचा नसून रशियन इंजिनियर दाहीर सेमेनोव्ह याने तीन वर्षांपूर्वी तयार केलेला कन्सेप्ट डिझाइनचा आहे. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:तथ्य पडताळणी : हा व्हिडियो खरंच इस्रायलकडून मिळणाऱ्या तंत्रज्ञानाचा आहे का?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False